कोणतीही कलाकृती म्हटलं की ती आवडणारे आणि न आवडणारे असे दोन गट असतात. मालिकांच्या बाबतीत तर हे सर्सास होतं. मालिकेची कथा कितीही उत्तम असली तरी तिला ट्रोल हे केलंच जातं. आई कुठे काय करते या मालिकेचा ट्रॅक बदलला आणि मालिकेलाही प्रेक्षकांनी प्रचंड ट्रोल केलं. मालिका संपणार असल्याचं जाहीर होताच मालिका न आवडणाऱ्या आनंद व्यक्त केला. पण मालिकेवर खरं प्रेम करणारे प्रेक्षक मात्र मालिका संपवू नका असं म्हणत आहेत.
advertisement
( आई कुठे काय करते संपताच अभिनेत्री रस्त्यावर, अशा अवस्थेत दिसली, PHOTO )
आई कुठे काय करते या मालिकेच्या शेवटच्या काही एपिसोड्सचं शुटींग सुरू आहे. दरम्यान एका मुलाखतीत बोलताना अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर भावुक झाली. मधुराणीने अरुंधतीसाठी एक भावुक करणारं पत्र लिहिलं. हे पत्र वाचून प्रेक्षक भावुक झालेत. त्यांनी मालिका संपवू नका असं म्हटलं आहे.
मधुराणीने अरुंधतीसाठी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, “प्रिय अरुंधती, खरंतर आता मी भावनाविवश झाली आहे. गेली पाच वर्ष तू आणि मी जणू एकरुप झालो. किती दिलं आहेस तू मला. किती शिकवलं आहेस. स्वत्वाची जाणीव करुन दिली आहेस. स्वाभिमान शिकवला आहेस, आत्मभान दिलं."
पाहा संपूर्ण व्हिडिओ
हा व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलंय, आई कूठे काय करते ही मालिका किती चांगली आहे बंद करू नका उगीच.
दुसऱ्या युझरनं लिहिलंय, आठवणीतली अरुंधती .सगळेच कलाकार पहिल्या दिवसापासून ते आता शेवटपर्यंत आमचेच होते .