advertisement

आई कुठे काय करते संपताच अभिनेत्री रस्त्यावर, अशा अवस्थेत दिसली, PHOTO

Last Updated:

aai kuthe kay karte actress photo outside in road : या अभिनेत्रीला आई कुठे काय करत मालिकेमुळे नवीन ओळख मिळाली. मालिकेतील तिची भुमिका प्रेक्षकांना आवडली.

आई कुठे काय करते अभिनेत्री
आई कुठे काय करते अभिनेत्री
मुंबई : आई कुठे काय करते ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेने मागील पाच वर्ष प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. अनेक कलाकारांना या मालिकेनं नवीन ओळख दिली. मालिका संपणार तोच कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मालिका संपतेय तर दुसरीकडे मालिकेतील एक अभिनेत्रीचा फोटो समोर आला आहे. ज्यात ती अत्यंत दयनीय अवस्थेत दिसत आहे. अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या अभिनेत्रीला आई कुठे काय करत मालिकेमुळे नवीन ओळख मिळाली. मालिकेतील तिची भुमिका प्रेक्षकांना आवडली. अरुंधतीच्या लाडक्या सूनेची भुमिका तिने साकारली आहे. आधी एका ऐतिहासिक मालिकेत तिने धाडसी भुमिका साकारली होती. त्यानंतर एका सूनेच्या भुमिकेत दिसली.
advertisement
आपण जिच्याविषयी बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. आई कुठे काय करते मालिका संपणार अशी माहिती समोर आली आणि दुसरीकडे अभिनेत्री अश्विनी महांगडे तिचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात ती मळकी साडी नेसून बसली आहे. विस्कटलेले केस आणि खोल विचारात हरवलेली दिसत आहे. अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का बसलाय.
advertisement
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने असा फोटो का शेअर केला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अश्विनीचा हा फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टमधील आहे. मालिका संपत असली तरी अश्विनी नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अश्विनीच्या नव्या सिनेमाचं शुटींग सुरू आहे. त्याच सिनेमाच्या सेटवरील अश्विनीचा हा फोटो आहे.
advertisement
"रोज सहावी दुःखे सत्तर, नशिबावरती शिंपडूनी अत्तर...एकच जीवन, एकच संधी, मग जगून पहावे स्वतः सविस्तर", असं कॅप्शन अश्विनीने हा फोटो सर्वांबरोबर शेअर केला आहे.
अश्विनीने काही दिवसांआधीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. अश्विनी अभिनेत्री होण्याबरोबर अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आई कुठे काय करते संपताच अभिनेत्री रस्त्यावर, अशा अवस्थेत दिसली, PHOTO
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement