'आई कुठे काय करते' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. नेहमीच ट्रेंडिंग आणि चर्चेत असणारी ही मालिका संपणार असल्याचं समजताच चाहते दुःखी झाले. कलाकारही भावूक झाले. आज शेवटच्या दिवशी मात्र कलाकार आणि चाहते सर्वांनाच अश्रू अनावर झाले. 'आई कुठे काय करते' सेटवरील शेवटच्या क्षणाचा व्हिडिओ Lokmat Filmy ने सोशल मीडियावर शेअर केलाय.
advertisement
Jui Gadkari: एका मतासाठी काहीही... VOTE करायला मतदान केंद्रावर अशी पोहोचली जुई गडकरी
व्हिडिओमध्ये शेवटच्या एपिसोडचे शूट होताच, मालिकेची सांगता होताच सर्वांनाच अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. सर्वच एकमेकांना मिठी मारून रडताना दिसलं. सेटवरील संपूर्ण टीम भावूक झालेली पाहायला मिळाली.
'आई कुठे काय करते' या मालिकेची मुख्य नायिका मधुराणी गोखले प्रभुलकर हिच्या या मालिकेनं खूप प्रसिद्धी मिळाली. याशिवाय अभिनेत्रीने दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. रुपाली भोसले, मिलिंद गवळी, असे अनेक चांगले कलाकार या मालिकेत होते. प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली.
दरम्यान, 2019 मध्ये 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तब्बल 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अखेर आता ही लोकप्रिय मालिका संपली असून मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.