अभिजीत बिचुकलेने टीव्ही 9 मराठीशी बोलताना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले. अभिजीत बिचुकले साताऱ्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. सातारा-जावळी मतदारसंघातून तो आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात लढणार आहे. "अभिजीत बिचुकले निवडून आले तर नवीन उमेद येईल. नवीन आशा येईल. नवीन धोरणे येतील आणि महाराष्ट्रात साताऱ्याचा डंका वाजेल", असा दावा बिचुकलेने केला आहे.
advertisement
बिचुकले म्हणाले, "2004 पासून सलग चार टर्म मी ही निवडणूक लढत आहे. विकासाच्या दृष्टीने विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि बिचुकले अशी लढत पाहायला मिळेल. सर्व सातारकरांनी मागील वेळी ज्याप्रमाणे उदयनराजेंचा पराभव केला होता त्याप्रमाणे आता मला विधानसभेत निवडून द्या."
दरम्यान, अभिजीत बिचुकले आता विधानसभा निवडणुकीत उतरल्यावर काय निकाल लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोक अभिजीत बिचुकलेला किती सपोर्ट करणार? किती मत देणार? बिचुकले जिंकणार की पडणार याकडे आता लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
