अभिजीत पानसे मुंबई पोलीस दलातील प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर बायोपिक करणार आहे. प्रदिप शर्मा हे माजी मुंबई पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक गुन्हेगारांना एन्काउंटरमध्ये ठार केलं. प्रदिप शर्मा यांचं जीवनपट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिजीत पानसे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
( Gaurav More Home : 'फिल्टर पाडा ते पवई, प्रवासासाठी खूप वर्ष लागली'; हक्काचं मिळताच गौरव मोरे भावुक )
advertisement
मुंबई पोलिस दलातील प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात ओळखलं जातं. त्यांच्या धडाकेबाज कारकिर्दीमुळे ते गँगवॉर संपवणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध झाले. टाइम्स मॅगझीनमध्ये त्यांचा फोटो देखील झळकला होता.
मुंबई स्वच्छ करण्यातील मोठा वाटा
मुंबई स्वच्छ करण्यात आणि गुन्हेगारी कमी करण्यात प्रदीप शर्मा यांचं नाव घेतलं जातं. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सर्वांना माहिती असलेल्या शर्मा यांचं माणूस म्हणून असलेलं आयुष्य मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. आतापर्यंत या बाजूला प्रकाशझोत मिळाला नव्हता. मात्र आता सिनेमाच्या माध्यमातून त्यांचा हा पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहे, असं पानसे यांनी सांगितलं.
वेगळ्या धाटणीचा चित्रपट
अभिजीत पानसे यांनी म्हटलं आहे की, आतापर्यंत गँगवॉरवर अनेक चित्रपट आले. पण प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट निश्चितच वेगळा असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. साहेबांना हा विषय आवडला असल्याचंही पानसे यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध
प्रदीप शर्मा यांच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असंही पानसे म्हणाले. प्रदीप शर्मा आणि अभिजीत पानसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शीवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली.
5 भाषेत होणार रिलीज
अभिजीत पानसे यांनी सांगितलं की, हा सिनेमा केवळ हिंदी किंवा मराठीतच नव्हे, तर 5 भाषेत लॉन्च होईल. या सिनेमात प्रदीप शर्मा यांची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.