या अभिनेत्याला त्याकाळातील अनेक मोठमोठ्या दिग्गज अभिनेत्यांनी तुला जमणार नाही असे म्हणत नाकारले होते. पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. हा अभिनेता म्हणजे नसीरुद्दीन शाह. त्यांनी अभिनयातून खूप नाव कमावले. पण त्यांच्यासाठी हा अभिनयाचा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या वडिलांना कधीच वाटत नव्हते की त्यांनी चित्रपटात काम करावे. त्यांनी त्याकाळी एका चित्रपटासाठी फक्त सात रुपये मानधन घेतले होते.
advertisement
मॉप मधील कलाकार म्हणून सुरुवात
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 ला उत्तर प्रदेश मधील बाराबंकी येथे झाला. त्यांचे वडील त्यांना एक अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहत होते. परंतु त्यांची अभ्यासात अजिबात रुची नव्हती. त्यांनी सिनेसृष्टीत काम करायचे मनाशी पक्के केले. पण त्यांनी सुरुवातीला नवखा कलाकार असताना मॉप सीनचे कलाकार असतात, तशा सीन मधून काम करायला सुरुवात केली. त्यांनी 1967 मध्ये आलेल्या 'अमन' या चित्रपटात मॉप सीन मध्ये काम केले होते. त्या गर्दीतील सीन ने त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली होती. त्यावेळी त्यांनी अगदी कमी म्हणजे साडेसात रुपये एवढ्या कमी पैशात काम केले होते.
ते एका मुलाखतीमध्ये म्हणाले, "त्या चित्रपटाच्यावेळी मी 16-17 वर्षांचा होतो. मोहन कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली मी मॉप सीन मध्ये काम केले. त्यात राजेंद्र कुमार यांच्या अंतिम संस्काराच्या एका मॉप सीन मध्ये मी काम केले होते . त्यात मी खूप सिरियस होतो. त्यातील मिळालेल्या पैशांमध्ये मी दोन आठवडे काढले."
तीन वेळा जिंकले नॅशनल अवॉर्ड
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी वयाच्या 25 व्या वर्षी 1975 मध्ये आलेला 'निशांत' चित्रपटात लीड रोल केला होता. त्यात शबाना आजमी आणि स्मिता पाटिल या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. 'स्पर्श', 'पार'आणि 'इकबाल' या चित्रपटांसाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.
