Tulsi Vivah 2025: 1 की 2 नोव्हेंबर, कोणती एकादशी ग्राह्य धरायची? तुळशी विवाहाचे दिवस, मुहूर्त आणि महत्त्व, Video

Last Updated:

Tulsi Vivah 2025: यंदा तुळशी विवाहाच्या तिथीबाबत अनेकांच्यात संभ्रम आहे. कार्तिकी एकादशी 1 की 2 नोव्हेंबरला याबाबत आदित्य जोशी गुरुजी यांनी माहिती दिलीये.

+
Tulsi

Tulsi Vivah 2025: 1 की 2 नोव्हेंबर, कार्तिकी एकादशी कधी? तुळशी विवाहाचे दिवस, मुहूर्त आणि महत्त्व, Video

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळशी विवाहानिमित्त भक्तांमध्ये उत्साह आहे. मात्र यंदा एक विशेष संभ्रम निर्माण झाला आहे. कारण 1 नोव्हेंबरला प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी आहे, तर 2 नोव्हेंबरला भागवत (वैष्णव) एकादशी आहे. त्यामुळे तुळशी विवाह कोणत्या दिवशी करावा, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर याबद्दल आदित्य जोशी गुरुजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
धार्मिक परंपरेनुसार, विष्णूचे भक्त म्हणजे वैष्णवांनी 2 नोव्हेंबरची भागवत एकादशी पाळावी, कारण हीच दिवस देवउठनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तर शिवभक्तांनी, म्हणजेच शैव परंपरेतील लोकांनी, 1 नोव्हेंबरची प्रबोधिनी एकादशी पाळावी.
या एकादशीनंतरच चातुर्मास समाप्त होतो आणि मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. त्यामुळे 2 नोव्हेंबरपासून विवाह, उपनयनासारखी शुभ कार्ये सुरू करता येतात. हाच दिवस तुळशी विवाहाचा आरंभ मानला जातो.
advertisement
तुळशी विवाहाचे मुहूर्त आणि योग
यंदा तुळशी विवाहाचे मुहूर्त 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2025 या दरम्यान आहेत. 2 नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल द्वादशी सकाळी 7.31 वाजता सुरू होत आहे.
तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.35 वाजल्यापासून आहे, कारण त्यावेळी सूर्यास्त होऊन प्रदोषकाल सुरू होतो.
गोधुली मुहूर्त: संध्याकाळी 5.35 ते 6.01
advertisement
संध्याकाळचा मुहूर्त: 5.35 ते 6.53
यावर्षी तुळशी विवाहाच्या दिवशी दोन शुभ योग जुळून आले आहेत
त्रिपुष्कर योग: सकाळी 7.31 ते संध्याकाळी 5.03
सर्वार्थ सिद्धी योग: 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.03 ते 6.34
तुळशी विवाहाचे महत्त्व
पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंनी वृंदेला वरदान दिले की ती त्यांच्या शालिग्राम रूपाशी विवाह करेल. त्यानंतर विष्णूपूजेत तुळशीशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुळशी विवाहाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवन सुखमय होते, तसेच अविवाहितांच्या जीवनात विवाहयोग निर्माण होतो, असे आदित्य जोशी गुरुजी सांगतात.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Tulsi Vivah 2025: 1 की 2 नोव्हेंबर, कोणती एकादशी ग्राह्य धरायची? तुळशी विवाहाचे दिवस, मुहूर्त आणि महत्त्व, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement