सलमान खानने आयएसपीएल सीझन 3 च्या इव्हेंटसाठी उपस्थिती लावली होती. या इव्हेंटदरम्यान अभिनेत्याने मोहम्मद कैफ यांनी सलमानसोबत मनमुराद गप्पा मारल्या. त्यांनी अभिनेत्याला चित्रपटातील एक सीन रिक्रिएट करायला लावला होता. टीझरमध्ये सलमानच्या हातात बॅट असल्याचा एक सीन आहे, तो रिक्रिएट करायला सांगितला होता. या दरम्यान अभिनेता म्हणाला की, " काही जणांना असं वाटतं की, माझा हा रोमँटिक लूक आहे. पण भावा मी कर्नल आहे, कर्नलचा लूक कोणालाही समजून येतो. आपल्या सहकाऱ्यांना आणि आपल्या टीमला कसं प्रोत्साहित करायचं, आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीने मी प्रेक्षकांनाही प्रोत्साहित करू शकतो. त्या लूकचा दुसरा अर्थ नाही. प्रेक्षकांच्या आशिर्वादाने आतापर्यंत जसं चालत आलंय त्याचपद्धतीने पुढेही चालत राहिल."
advertisement
"उगाच कोणतेही प्रेक्षकांसमोर एक्सप्रेशन्स आणून फायदा नाही. त्यामुळे आधीपासून जसे चालत आले आहे, तसेच चालत राहिल." असं मुलाखतीच्या शेवटच्या भागात सलमान म्हणाला आहे. 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून हा चित्रपट येत्या 17 एप्रिल 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमानसोबत मुख्य भूमिकेत चित्रांगदा सिंग सुद्धा दिसणार आहे. बॉलीवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि उर्वरित टीम चित्रपटातले सीन्स पूर्ण करत आहेत. काही नवीन दृश्ये देखील जोडली जात आहेत. चित्रपटाविषयी पीटीआयमध्ये बोलताना सलमान खान म्हणाला की, हा चित्रपट शारीरिकदृष्ट्या फार कठीण होता. दिवसेंदिवस काम कठीण होत गेले. मला प्रशिक्षणासाठी बराच वेळ द्यावा लागला. पूर्वी मी एक किंवा दोन आठवड्यात प्रशिक्षण घ्यायचो. पण आता तसं राहिलं नाही. या चित्रपटासाठी मी विशेष ट्रेनिंग घेत चित्रपटासाठी विशेष काम केलं.", असं अभिनेत्याने सांगितलं.
