यशोधन गडकरी यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "मुंबादेवी ही मुळची मराठी, आग्री आणि कोळी लोकांची देवी. इथे आल्यावर एक गोष्ट मला जाणवली, मुंबई सर्वांना सामावून घेते असं म्हणतात आणि मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबई असं नाव पडलं."
( काही वर्षांआधी आईचं निधन, यंदाच्या दिवळीत ती वेगळ्याच रुपात भेटायला आली, छाया कदमचे PHOTO )
advertisement
"गोष्ट काय जाणवली मला इथे, आपण बघा कर्नाटकातील मंदिरांमध्ये गेल्यानंतर आपल्याला कर्नाटकात आल्याचा फिल येतो, गुजरातमधल्या मंदिरात गेल्यानंतर गुजरातमध्ये गेल्याचा फिल येतो. तसंच युपी, बिहार इथल्या मंदिरांमध्ये गेलो की तिथे गेल्याचा फिल येतो, वैष्णव देवीला गेलो की वैष्णवदेवीचा फिल येतो. मात्र मुंबईतल्या मुंबादेवी मंदिरात गेल्यामध्ये देखील तुम्ही युपी बिहार किंवा वैष्णव देवीच्या मंदिरात आल्याचाच फिल येतो."
यशोधन यांनी पुढे म्हटलं, "इथे बाहेर मंदिर परिसरात मराठीपण राहिलंय असं मला बिलकुलच वाटत नाहीये. कारण पूजा साहित्य विकणारी सगळे विक्रेते बऱ्यापैकी अमराठी दिसतायत. मराठी हाताच्या बोटावर मोजणारे असतील. पूजेच्या साहित्याचा जो प्रकार आहे तो सगळा वैष्णव देवी आणि युपी, बिहार वरच्या बाजूला असतो तसा आहे."
"आता आपण महाराष्ट्रात, मुंबईत आलो आहोत तर आपल्या पद्धतीच्या ओट्या आणि पूजा साहित्य दिसायला हवं असं माझं व्यक्तिगत मत आहे. असो शेवटी समरसता आहे ही येऊ घातलेली. मुंबई सर्वांना सामावून घेतेय पण हे सामावून घेत असताना मराठी माणूस कुठे आहे याचा प्रत्येकाने विचार करायचा. वाद घालण्यापेक्षा विचार केलेला जास्त बरा", असंही त्यांनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलंय.
अभिनेते यशोधन गडकरी हे अभिनेत्याबरोबच दिग्दर्शक आणि लेखकही आहेत. गेली अनेक वर्षांपासून ते त्यांचं युट्यूब चॅनेलही चालवत आहेत. त्यांच्या युट्यूबर ट्रॅव्हल व्हिडीओ करतात. कामाच्या निमित्तानं प्रवास करताना त्यांना दिसणाऱ्या सुंदर वास्तू, मंदिरे, प्रेक्षणीय स्थळांची माहिती ते त्यांच्या व्हिडीओतून देत असतात.
