राजेश खन्ना यांच्या आयुष्यात डिम्पल कपाडिया आधी अनिता अडवाणी होती, असं तिने स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण तेव्हा मी खूप लहान असल्याने आम्ही लग्न केलं नाही. नंतर राजेश खन्ना जयपूरला गेले आणि तिथं डिम्पलशी लग्न केल्याचं ती म्हणाली होती.
12 वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होते
अनिता अडवाणी मुलाखतीत म्हणाल्या होत्या ती, "जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी टिनएजर होते. मी एका पारंपरिक कुटुंबातून आले होते, त्यामुळे मला वाटायचं की ते माझे सर्वस्व आहेत. जसजशी मी मोठी होत गेले, तसतसे लोक माझ्या मागे लागले, पण मला दुसरा कोणीच दिसत नव्हता. त्यांनी माझ्या हृदयावर आणि मनावर त्यांनी इतका खोल ठसा उमटवला की, मला त्याच्याशिवाय दुसरा कोणीही आवडला नाही. दुसऱ्या कोणत्याही पुरुषाने मला स्पर्श करावा असं मला वाटत नव्हतं"
advertisement
Riteish-Genelia Deshmukh : रितेश-जेनिलिया पुन्हा लावणार 'वेड'! या दिवशी नवीन फिल्म, पहिला लुक समोर
"शेवटी जेव्हा त्याच्या आयुष्यातून सगळे निघून गेले, त्याच्याजवळ कुणीच नव्हतं तेव्हा आम्ही पुन्हा भेटलो. आम्ही 12 वर्षे एकत्र होतो", असं अनिता म्हणाल्या होत्या.
गुपचूप केलं होतं लग्न
डिम्पल कपाडियासोबत लग्न झाल्यानंतर राजेश खन्ना अनेक वर्षे अभिनेत्री अनिता अडवाणीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अनिताने एका मुलाखतीत त्यांनी गुपचूप लग्न केल्याचंही सांगितलं होतं, "आमच्या घरात एक छोटं मंदिर होतं. मी एक काळे मणी असलेलं सोन्याचं मंगळसूत्र बनवून घेतलं होतं. त्यांनी ते मला घातलं आणि माझ्या भांगेत सिंदूर भरत म्हणाले होते आजपासून तू माझी जबाबदारी. अशा पद्धतीने एका रात्रीत आमचं लग्न झालं. मी त्यांच्यासोबत आहे असं मीडियाने आधीच प्रसिद्ध केलं होतं, त्यामुळे आम्ही लग्न केल्याची जाहीर घोषणा करण्याची गरज आम्हाला कधीच वाटली नाही.", असं तिने सांगितलं होतं.
1 एप्रिलला रिलीज केली फिल्म, झाली हिट! पण नंतर फिल्मच्या दोन्ही अभिनेत्री 'गायब', नेमकं काय घडलं?
राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांतही अनिता त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलं जातं.
पत्नीचा दर्जा मिळण्यासाठी कोर्टात याचिका
राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासोबतच्या आपल्या कथित संबंधांना विवाह म्हणून मान्यता मिळावी, यासाठी अनिताने कोर्टात एक याचिका दाखल केली होती. राजेश खन्ना यांच्यासोबतच्या आपल्या नात्याला वैवाहिक दर्जा देण्याची मागणी तिने केली होती.
मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने दिंडोशी न्यायालयाचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे.
