आपल्या डान्सने लाखो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मधुमती याचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विंदू दारा सिंह यांनी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची माहिती दिली आहे. अभिनेत्री मधुमती यांना बॉलिवूडमध्ये दुसरी हेलन म्हणूनही ओळखलं जात होतं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
advertisement
विंदू दारा यांनी पोस्ट शेअर करत मधुमती यांच्या श्रद्धांजली वाहिली आहे. भावुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, त्या आमच्या शिक्षिका होत्या, मार्गदर्शक आणि मैत्रीण होत्या. फक्त माझ्यासाठी नाही तर अक्षय कुमार, तब्बू आणि अशा अनेक विद्यार्थ्यांसाठी ज्यांना त्यांनी डान्स शिकवला. विंदू दारा यांनी सांगितलं की, अभिनेत्री मधुमती सकाळी उठल्या आणि त्यांनी एक ग्लास पाणी प्यायलं त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
अभिनेत्री मधुमतीचा जन्म 30 मे 1944 साली मुंबईतील पारसी कॉलनीमध्ये झाला. त्यांचे वडील पेशानं जज होते. पण मधुमाती यांना मात्र नृत्याची आवड होती. नृत्याबरोबरच त्यांनी अभिनय करण्यासही सुरूवात केली. त्या भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी आणि कथकली डान्सर होत्या. नृत्याशिवाय त्यांचं आयुष्य अधुरं होतं. त्यांनी संगीत आणि नृत्य क्षेत्रात मोलाचं काम केलं. अनेक सिनेमांमध्ये कलाकारांना त्यांनी डान्स शिकवला आहे. त्यांच्या अनेक शिष्यांनी भारतीय सिनेमामध्ये नाव कमावलं आहे.