मधुराणी गोखलेने नुकतीच मिर्ची मराठी पॉडकास्टला एक मुलाखत दिली. यावेळी तिने कलाकारांचा रियाज करणं किती गरजेचं असतं यावर भाष्य केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय म्हणाली मधुराणी गोखले?
मिर्ची मराठी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये मधुराणी म्हणाली, “अभिनेत्यांना असं वाटतं की, आम्ही काय रियाज करायचा. मी खूप 70, 80 जाहिराती केल्या असतील. त्याच्या आधी मी 87 ऑडिशन दिली असतील ज्या फेल गेल्या होत्या. त्यानंतर मला पहिली जाहिरात मिळाली. पण त्या 87 ऑडिशन्स, ज्या फेल गेल्या होत्या तो माझा रियाज होता. ती एक जाहिरात क्रॅक करण्यासाठी. तो अभिनेत्याला करत राहणं गरजेचं आहे.”
advertisement
पुढे मधुराणी म्हणाली, “चांगली नाटकं जाऊन बघायला पाहिजे. मी करते अजूनही. मग एखादं कोणीतरी दिलेलं एक्सप्रेशन मला आवडलं तर मी आरशात करून बघते. तो डायलॉग बोलून बघते. हे मला क्रॅक करता येतंय का बघते. हे मला जमेल का? मग मी करून बघते ते. हा रियाज करत रहायला लागतो. आजकाल आपल्याकडे मोबाईलमध्ये कॅमेरा आहे. करा शूट तुमचा तुम्ही बघा. अशा कितीतरी पद्धतीने तुम्ही रियाज करू शकता.”