सुरूचीनं लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. घरचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. अभिनेत्री सुरूची अडाकर हिनं 'ओळख' या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'का रे दुरावा' या मालिकेनं तिला ओळख मिळवून दिली. त्यानंतर मधली काही वर्ष ती मनोरंजन क्षेत्रात फारशी दिसली नाही. नुकत्याच येऊन गेलेल्या 'बाईपण भारी देवा' या सिनेमात सुरूचीनं काम केलं.
advertisement
हेही वाचा - "30 वर्ष जुन्या..." सायली संजीवने सांगितला 'तो' किस्सा; स्वतःहून कधीच घेतली नाही पैठणी
अभिनेता पियुश रानडेचं सुरूची अडारकबरोबर हे तिसरं लग्न आहे. पियुषचं पहिलं लग्न हे प्रसिद्ध अभिनेत्री शाल्मली तोळे हिच्याबरोबर झालं होतं. पण त्याचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर पियुशनं अभिनेत्री मयुरी वाघ हिच्याबरोबर लग्नं केलं. 2017मध्ये दोघांनी लग्न केलं पण पियुशचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकू शकलं नाही. दोघांच्या घटस्फोटानंतर काही वर्षांनी पियुषनं आता अभिनेत्री सुरूची अडारकर हिच्याबरोबर लग्न केलंय.
अभिनेता पियुश रानडे सध्या कलर्स मराठीवरील काव्यांजली मालिकेत काम करतोय. पियुषनं त्याच्या अभिनयाची सुरूवात नाटकांपासून केली आहे. अनेक टेलिव्हिजन मालिका आणि सिनेमात त्यानं काम केलं आहे. 'लज्जा', 'एकाच ह्या जन्मी जणू', 'अस्मिता', 'शौर्य', 'साथ दे तू मला', 'पिंकिचा विजय' असो सारख्या अनेक प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेत त्यानं काम केलं आहे.