'सुंदरा मनामध्ये भरली', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'अबोली' सारख्या मालिका तसंच 'बाईपण भारी देवा' सिनेमातील 'मंगळागौरी'चं गाणं लिहिणारी अभिनेत्री अदिती द्रविड ही राहुल द्रविडची पुतणी आहे.
advertisement
आदिवतीने सोशल मीडियावर राहुल द्रविडबरोबरचा फोटो पोस्ट करत तो माझा काका असल्याचं सांगितलं आणि सगळ्यांचा भुवया उंचावल्या होत्या. अदितीनं नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना काका राहुल द्रविडचं खूप कौतुक केलं आहे.
सकाळ प्रीमिअरला दिलेल्या मुलाखतीत अदितीने राहुलबरोबरच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, "कसं होतं मी लहान होते तेव्हापासूनच राहुल द्रविडचं करिअर हे यशाच्या शिखरावर होतं. त्यामुळे फार असं घरगुती वातावरणात आम्ही नव्हतो. कारण त्याच्या सतत मॅचेस किंवा काहीतरी सुरू असायचं."
"माझे बाबा त्या क्षेत्रात असल्यामुळे खूप वेळेला ते मॅचेसना मला घेऊन जायचे आणि मला आवड असल्याने मीसोबत जायचे. तिथे गाठीभेटी व्हायच्या."
"सोशल मीडियावरचा जो फोटो आहे तो अशाच एका मॅचला मी गेले होते तेव्हाचा आहे."
राहुल द्रविडच्या लाइव्ह मॅचेसचा अनुभव सांगताना अदिती म्हणाली, "मी त्यांच्याबद्दल बोलतानाच बोल्ड झालीये. मी ते बघताना तर... त्यांचा ऑराचं वेगळा आहे."
"कलाकार आणि स्पोर्ट्स पर्सन यांच्यातील स्पिरिट कॉमन आणि ते महत्त्वाचं आहे. कारण समोर आल्यानंतर तो ऑरा असतो खूप भारी आहे."
"ते इतके मितभाषी आहेत. राहुल द्रवीड फार कमी बोलतो", असं अदितीने सांगितलं.