प्रोमोमध्ये गौरव खन्ना आपल्या कुटुंबाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसते. आकांक्षाची घरात एंट्री होताच गौरव खूप इमोशनल होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो. गौरव तिच्याजवळ येताच 'बिग बॉस' त्याला फ्रीज करतात. त्यामुळे त्याला पत्नीला भेटता येत नाही. काही वेळानंतर रिलीज होताच गौरव तिला घट्ट मिठी मारतो आणि तिच्या गालांवर किस करतो.
advertisement
आकांक्षाची बिग बॉसला धमकी
नंतर दोघे लिव्हिंग रूममध्ये येताच 'बिग बॉस' गौरव खन्नाला पुन्हा फ्रीज करतात. यामुळे आकांक्षाचा पारा चढतो, पण ती खूप मजेशीर पद्धतीने बिग बॉसला धमकी देते. पतीला भेटता येत नाहीये, हे पाहून आकांक्षाने थेट बिग बॉसलाच चॅलेंज दिले. आकांक्षा मजेशीर अंदाजात म्हणाली, "रिलीज करा, नाहीतर मी गौरव खन्नाला आता अडल्ट वाली पप्पी देईन."
आकांक्षाचे हे बोलणे ऐकून मागे उभा असलेला स्पर्धक अमाल मलिक लगेच ओरडतो, "हो दे, दे, दे!" त्यावर बिग बॉस मिश्किलपणे म्हणतात, "गौरव... काही नाही!" हे ऐकून घरातील सर्व स्पर्धक आणि आकांक्षा जोरजोरात हसू लागतात.
फॅमिली वीकची धमाल
'बिग बॉस १९' मधील फॅमिली वीकची सुरुवात कुनिका सदानंद यांच्या मुलाच्या एंट्रीने झाली. कुनिका यांनी त्यांचा मुलगा अयान लाल याची भेट होताच मिश्किलपणे त्याचं आणि अशनूरचे लग्न लावून देण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर अशनूरचे वडील आल्यावरही तिने तोच प्रस्ताव ठेवला, ज्यामुळे घरात एकच हशा पिकला. याशिवाय फरहानाची आई देखील तिला सपोर्ट करण्यासाठी घरात येणार आहे.
