TRENDING:

जय दुधाणेनंतर आणखी एका 'BIGG BOSS' विनरला पोलिसांनी उचललं, व्हायरल व्हिडीओने घातला धुमाकूळ, काय घडलं?

Last Updated:

हिंदी 'बिग बॉस'च्या विजेत्याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोण आहे हा अभिनेता?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: 'बिग बॉस मराठी ३' चा उपविजेता आणि 'स्पिट्सविला'चा विजेता जय दुधाणे याला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. ही बातमी बाहेर येताच एकच खळबळ उडाली. या धक्क्यातून बिग बॉस प्रेमी सावरत नाहीत, तोच एक आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदी 'बिग बॉस'च्या विजेत्याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोण आहे हा अभिनेता?
News18
News18
advertisement

रिॲलिटी शोजचा किंग आणि 'बिग बॉस'चा विजेता प्रिन्स नरुला पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पण यावेळी चर्चेचं कारण त्याचं एखादं गाणं किंवा शो नसून, चक्क पोलिसांनी त्याला केलेली अटक आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वणव्यासारखा पसरला, ज्यात पोलीस प्रिन्सला गाडीत बसवून घेऊन जाताना दिसत आहेत.

प्रिन्स नरुलाला अटक, नेमकं काय घडलं?

advertisement

व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये प्रिन्स नरुला पोलिसांच्या वेढ्यात दिसत असून त्याचे हात पकडून पोलीस त्याला जीपमध्ये ढकलत असल्याचं चित्र होतं. प्रिन्सच्या चेहऱ्यावरचे हावभावही तणावपूर्ण वाटत होते. या व्हिडिओने इंटरनेटवर एकच खळबळ उडवली. "प्रिन्सला अटक झाली का?", "काय गुन्हा केला त्याने?", अशा प्रश्नांचा भडिमार सोशल मीडियावर सुरू झाला. काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा रनरअप जय दुधाणे याला अशाच प्रकारे एका प्रकरणात अटकेला सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे प्रिन्सच्या बाबतीतही काही गंभीर घडलंय का, अशी शंका व्यक्त केली जात होती.

advertisement

अटकेच्या व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रिन्सने सोडलं मौन

चाहत्यांचा जीव टांगणीला लागलेला असताना अखेर खुद्द प्रिन्स नरुलाने समोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितलं की, "मला अटक झालेली नाही. तो व्हायरल झालेला व्हिडिओ एका ब्रँडच्या जाहिरातीच्या शूटिंगचा भाग होता." प्रिन्सने पुढे सांगितलं की, कथानकाच्या मागणीनुसार तो अटकेचा सीन चित्रित करण्यात आला होता, मात्र कोणीतरी तो व्हिडिओ शूट करून चुकीच्या संदर्भाने व्हायरल केला. त्यामुळे चाहत्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्याने केलं आहे.

advertisement

रिॲलिटी शोजचा खरा किंग

प्रिन्स नरुलाला 'किंग ऑफ रिअॅलिटी शोज' उगाच म्हटलं जात नाही. त्याने आजवर अनेक शोमध्ये त्याचा डंका वाजवला आहे. तो 'एमटीव्ही रोडीज १२' चा विजेता ठरला. यानंतर त्याने 'स्प्लिट्सव्हिला ८' चं विजेतेपद जिंकलं. देशातील सर्वाधिक वादग्रस्त शो 'बिग बॉस ९' चाही तो विजेता ठरला. इतकंच नाही, तर 'नच बलिये ९' चं विजेतेपद त्याने पत्नी युविकासोबत पटकावलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

सलमान खानच्या 'बिग बॉस ९' मध्ये आपली आक्रमक खेळी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने ट्रॉफी पटकावली होती. याच शोमध्ये त्याची भेट युविका चौधरीशी झाली आणि २०१८ मध्ये हे जोडपे विवाहबंधनात अडकले.

मराठी बातम्या/मनोरंजन/
जय दुधाणेनंतर आणखी एका 'BIGG BOSS' विनरला पोलिसांनी उचललं, व्हायरल व्हिडीओने घातला धुमाकूळ, काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल