अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तांत्रिक बिघाड झाला. विमान रनवेच्या बाजूला जाऊन आदळलं आणि क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या भयावह अपघातात दादांसह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. शिस्त आणि कामाचा प्रचंड वेग यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दादांचा असा अंत होईल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
advertisement
गौतमी पाटीलबद्दल प्रश्न अन् अजित दादांचं हटके उत्तर
अजित पवारांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या सडेतोड बोलण्याच्या शैलीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. राजकीय सभेच्या भाषणापासून ते पत्रकारांना देणाऱ्या रोखठोक उत्तरांपर्यंत दादांचा वेगळाच स्वॅग होता. यातच गौतमी पाटील हिने बैलासमोर केलेल्या डान्सवरून विचारलेल्या प्रश्नाला दादांनी दिलेलं उत्तर पुन्हा चर्चेत आलंय.
मायरा वैकुळच्या पालकांचा कठोर निर्णय, सततच्या ट्रोलिंगला कंटाळून उचललं मोठं पाऊल, नेमकं काय घडलं?
जेव्हा पत्रकारांनी गौतमी पाटीलच्या डान्सबद्दल विचारलं, तेव्हा दादा आपल्या खास शैलीत म्हणाले होते, "अरे तुला काय वाईट वाटतंय? ती बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास होतोय? अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली होती.
अजित पवार पुढे म्हणाले होते, "बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेचं साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे."
वेळ पाळणारा लोकनेता हरपला
महाराष्ट्राच्या राजकारणात 'वेळ पाळणारा माणूस' अशी त्यांची ख्याती होती. सकाळी ७ वाजता कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणारा हा एकमेव नेता होता. फाईलवरची सही असो किंवा एखाद्या प्रश्नावरचं उत्तर, दादा कधीच गोंधळात नसायचे. "हो तर हो, नाही तर नाही," हा त्यांचा स्वभाव विरोधकांनाही त्यांची दखल घेण्यास भाग पाडायचा. आज त्यांच्या जाण्याने बारामतीकर सुन्न झाले असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
तीन दिवसांचा दुखवटा; शासकीय इतमामात निरोप
राज्य सरकारने अजित दादांना मानवंदना देण्यासाठी २८ ते ३० जानेवारी दरम्यान शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
