२१ ऑक्टोबरपूर्वी रेकॉर्ड मोडण्याची संधी!
२१ ऑक्टोबरला 'थामा' हा मोठा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'जॉली एलएलबी ३' चे शो कमी होतील किंवा पूर्णपणे थांबवले जातील. त्यामुळे अक्षयच्या चित्रपटाला रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी ही शेवटची संधी आहे.
advertisement
'जॉली एलएलबी ३' ने पहिल्या आठवड्यात ७४.०० कोटी, दुसऱ्या आठवड्यात ९.०० कोटी, तिसऱ्या आठवड्यात ७.३० कोटी, चौथ्या आठवड्यात ३.९० कोटी, तर २९ व्या दिवशी सायंकाळी ७.०५ वाजेपर्यंत ०.१४ कोटी कमावले. अशाप्रकारे या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई ११४.३४ कोटी झाली आहे.
'अवेंजर्स एंडगेम'ला 'जॉली' देणार टक्कर!
'जॉली एलएलबी ३' ने नुकताच आमिर खानच्या 'गजनी' या चित्रपटाचा लाईफटाईम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. आता त्याच्या समोर दोन बॉलिवूड चित्रपट आहेत, ते म्हणजे 'रा-वन' आणि 'बाला'. मात्र, या चित्रपटांनंतर एका अशा हॉलिवूड चित्रपटाचा रेकॉर्ड धोक्यात आला आहे, ज्याने जगभरात तब्बल १३,३३५ कोटी रुपये कमावले होते.
Sacnilk नुसार, 'अवेंजर्स एंडगेम'ची भारतातील एकूण कमाई ११६.४७ कोटी रुपये होती. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी 'जॉली एलएलबी ३' ला फक्त २ कोटी रुपयांची कमाई करण्याची गरज आहे. चित्रपट पाचव्या आठवड्यात दाखल झाला असून, वीकेंडमध्ये कमाई वाढण्याची मोठी शक्यता असल्याने, अक्षय कुमारच्या चित्रपटाकडून हा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडला जाईल अशी आशा आहे.