दिलेल्या मुलाखतीत निर्माते शैलेंद्र सिंह म्हणाले की, "अक्षय कुमार हा 'पैशांच्या मागे धावणारा' अभिनेता आहे. तो पहिला बिझनेसमन आहे, नंतर अभिनेता आहे. जेव्हा मला अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी खूपच आनंदित होतो. निर्मात्यांनी चित्रपटाच्या शुटिंगचं ठिकाण मुन्नार ठरवलं होतं. परंतु अक्षय कुमारच्या बिझी शेड्युल्डमुळे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होतं. आम्ही मुन्नारवरून कॅलगरी, केप टाऊन आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगसाठी गेलो, ज्यामुळे निर्मात्यांचा बजेट प्रचंड वाढत गेला. खरंतर, चित्रपटाचा बजेट 30 ते 35 कोटी रूपये होता, पण तो कालांतराने फार वाढतच गेला."
advertisement
मुलाखती दरम्यान निर्माते पुढे म्हणाले की, "शुटिंगच्यावेळी अक्षय एकदा सहज म्हणाला की, तुमचा सिनेमा पाहायला थिएटरमध्ये कोणीही येणार नाही. तर मी त्याला म्हणालो की, मित्रा तुझा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी कोणीही नाही आलं, तर तुला सुद्धा त्याबद्दलची जिम्मेदारी घ्यावी लागेल. तू माझ्याकडून फी म्हणून बरेच पैसे घेतलेस. काही तरी परत कर." शैलेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, अक्षय कुमारने या विनंतीला नकार दिला आणि त्यांना काहीही पैसे परत मिळाले नाहीत. शैलेंद्र यांनी मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, "अक्षय कुमार चित्रपटाच्या कोणत्याही मिटिंगमध्ये बोलताना त्याची फी हळूहळू वाढवतो. जसे की, पहिल्यांदा तो 15 कोटी रुपये घेतो, नंतर 21 कोटी रुपये, त्यानंतर 27 कोटी रुपये, आणि एकाएकी 36 कोटी रुपये होतात. त्याला माहितीये तो काय करतोय आहे ते... तो आधी एक व्यापारी आहे आणि नंतर अभिनेता..."
इंडिया टिव्हीवरील 'आप की अदालत' या शोमध्ये अक्षय कुमारने भरपूर पैसा कमवण्याबद्दल भाष्य केले होते. तो म्हणाला की, "जर मी भरपूर पैसे कमावले असतील, तर मी कोणाकडून पैसे लुटलेले नाहीत. मी माझ्या मेहनतीने इतके पैसे कमावले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये येतोय. आयुष्यामध्ये पैशाची आवश्यकता आहे, परंतु तो व्यावहारिक पद्धतीने असायला हवा."
