TRENDING:

Dhurandhar 2 मध्ये फक्त या सीनमध्येच दिसणार Akshaye Khanna, सीक्वेलमध्ये काय पाहायला मिळणार?

Last Updated:

Dhurandhar 2 Akshaye Khanna : ‘धुरंधर 2’ संदर्भात अक्षय खन्नाच्या री-शूटिंगच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अक्षय खन्ना कोणत्याही नवीन सीनचे शूटिंग करत नाही आहे. सीक्वेलमध्ये त्याची भूमिका फक्त एका खास फ्लॅशबॅक सीनपुरती मर्यादित आहे. ज्याचे शूटिंग आधीच पूर्ण झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2' या सिनेमाची सध्या चर्चेत आहे. दरम्यान अशा अफवा पसरल्या होत्या की अक्षय खन्ना पुन्हा सेटवर परतला असून काही सीन शूट करत आहे. मात्र, पिंकविलाच्या माहितीनुसार ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. अक्षय खन्ना सध्या कोणत्याही नवीन सीनचे शूटिंग करत नाही. या बहुप्रतिक्षित सिक्वेलमध्ये तो नक्कीच दिसणार आहे, पण त्याची भूमिका केवळ काही महत्त्वाच्या फ्लॅशबॅक सीनपुरतीच मर्यादित असेल. हा फ्लॅशबॅक सीन चित्रपटाच्या सुरुवातीच्या शूटिंगदरम्यानच पूर्ण झाला होता.

advertisement

एका सूत्राने स्पष्ट सांगितले आहे की,"सध्या अक्षयसोबत कोणतेही नवीन किंवा अतिरिक्त शूटिंग सुरू नाही. त्यांचे सर्व सीन आधीच शूट झाले आहेत आणि ते कथेतील अतिशय महत्त्वाचे फ्लॅशबॅक भाग आहेत". प्रत्यक्षात, पहिल्याधुरंधरचित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकैतची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्याचं हे दमदार कॅरेक्टर आजही लोकांच्या लक्षात आहे. मात्र पहिल्या भागात त्या पात्राचा शेवट झाल्यामुळे, सिक्वेलमध्ये त्याला फ्लॅशबॅकच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे, जेणेकरून कथा अधिक रंजक बनेल.

advertisement

ट्रेलरचे एडिटिंग सुरू

धुरंधर 2’ हा सिनेमा आता पोस्ट-प्रोडक्शनच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. दिग्दर्शक आदित्य धर स्वतः ट्रेलरचे एडिटिंग करण्यात व्यस्त आहेत. टीमचा प्लॅन आहे की फेब्रुवारीच्या अखेरीस ट्रेलर रिलीज करण्यात यावा. मिळालेल्या माहितीनुसार,“आदित्य धर ट्रेलरच्या एडिटिंगवर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. ट्रेलरही पहिल्यासारखाच जबरदस्त आणि दमदार असावा, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढेल.” याशिवाय म्युझिकचंही काम जोरात सुरू आहे. साउंड आणि व्हिज्युअल इफेक्ट्स या दोन्हींवर टीम विशेष भर देत आहे, जेणेकरून चित्रपट नेत्रदीपक दिसेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाची वाढेल गोडी, पारंपरिक कारळ्याची बनवा चटणी, सोप्या रेसिपीचा Video
सर्व पहा

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar 2 मध्ये फक्त या सीनमध्येच दिसणार Akshaye Khanna, सीक्वेलमध्ये काय पाहायला मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल