[video mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-22-at-5.59.07-PM-2024-12-bc97ce93d1b78485679ac15a6353f689.mp4"][/video]
उस्मानिया युनिव्हर्सिटी जेएसीच्या अनेक सदस्यांचा समावेश असलेल्या या गटाने अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि 4 डिसेंबर रोजी एका सिनेमात चेंगराचेंगरी सारख्या परिस्थितीत मृत्यू झालेल्या 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई देण्याची मागणी केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुष्पा २ ने जगभरात १००० कोटींचा गल्ला जमवला. त्याचवेळी हैदराबाद पोलिसांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक केली. ‘पुष्पा 2’ च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी आणि त्यात एका महिलेचा झालेला मृत्यू या प्रकरणी अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्याच दिवशी त्याला जामीनही मंजूर झाला.
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती असताना एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, अल्लूवर कलमांखाली चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर अल्लू अर्जुनवर अनेक स्तरातून टीका केली जात आहे.