TRENDING:

'कांतारा 1' च्या गदारोळात हळूच रिलीज झाली बॉलिवूड फिल्म, 100 कोटींच्या क्लबमध्ये केली धमाकेदार एन्ट्री, तुम्ही पाहिली का?

Last Updated:

Bollywood Film : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' ची चर्चा सर्वाधिक असताना, एका दुसऱ्याच बॉलिवूड सिनेमाने गुपचूप १०० कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे!

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवाळीचा सण आणि सुट्ट्यांचा मोठा मोसम यामुळे सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी आहे. एकापाठोपाठ एक मोठे चित्रपट प्रदर्शित होत असल्याने निर्मात्यांसाठीही हा काळ आनंदाचा ठरला आहे. यंदाच्या दिवाळीच्या रणांगणात ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' आणि आयुष्मान खुराना-रश्मिका मंदाना यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'थामा' यांची चर्चा सर्वाधिक असताना, एका दुसऱ्याच बॉलिवूड सिनेमाने गुपचूप १०० कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे!
‘कांतारा: चॅप्टर 1’चा बॉक्स ऑफिसवर जलवा
‘कांतारा: चॅप्टर 1’चा बॉक्स ऑफिसवर जलवा
advertisement

'सनी संस्कारी'ने मारली बाजी

चित्रपटगृहांत 'कांतारा १' आणि 'थामा' या दोन मोठ्या चित्रपटांचे कौतुक सुरू असताना, वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सगळ्यांना मागे टाकले आहे. दिग्दर्शक शशांक खैतान दिग्दर्शित या फॅमिली एंटरटेनर चित्रपटाने सर्वांना चकमा देत १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. या चित्रपटाला खासकरून मेट्रो शहरे आणि मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई चांगली सुरू आहे.

advertisement

जगभरातील कमाई १०२ कोटी पार!

या चित्रपटातील मुख्य भूमिकेत वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत रोहित सर्राफ आणि सान्या मल्होत्रा सारखे कलाकार आहेत. या चित्रपटाने परदेशी बाजारात देखील मोठी कमाई केली आहे. आकडेवारीनुसार, 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाने १९ दिवसांमध्ये भारतात नेट ६५.५३ कोटींहून अधिक कमाई केली आहे, आणि तो लवकरच ७० कोटींचा आकडा पार करेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चित्रपटाने परदेशात २.७५ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास २४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे, जगभरातील या चित्रपटाची एकूण कमाई आता १०२.६४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे!

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन
सर्व पहा

'कांतारा' आणि 'थामा'च्या चर्चांमध्ये 'सनी संस्कारी'ने मिळवलेले हे मोठे यश बॉलिवूडसाठी दिवाळीचा मोठा बोनस ठरला आहे. आता या तिन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर पुढील काळात कशी स्पर्धा होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'कांतारा 1' च्या गदारोळात हळूच रिलीज झाली बॉलिवूड फिल्म, 100 कोटींच्या क्लबमध्ये केली धमाकेदार एन्ट्री, तुम्ही पाहिली का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल