TRENDING:

KBC Junior : 'तेव्हा हे गलिच्छ लोक गप्प होते...', ईशित भट्टला ट्रोल करणाऱ्यांवर बरसली बॉलिवूड सिंगर, सगळा माज उतरवला

Last Updated:

KBC JUnior Ishit Bhat Controversy : KBC 17 मध्ये ईशित भट्टच्या वागणुकीवरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. अशातच एका प्रसिद्ध गायिकेने ईशितची बाजू घेतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या सोशल मीडियावर एकच नाव गाजतंय ते म्हणजे 'कौन बनेगा करोडपती १७' (KBC 17) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला पाचवीतील ईशित भट्ट. या चिमुकल्या स्पर्धकाचा अतिआत्मविश्वास आणि होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी केलेले रूड वर्तन चर्चेचा विषय बनले आहे. शोमधील त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या वागणुकीवरून त्याला ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर ईशितच्या पालकांच्या पालकत्वावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी ज्याप्रकारे शोमधील सर्व परिस्थिती हाताळली आणि ईशितचे कान टोचले यावरून त्यांचं कौतुक होतंय.
News18
News18
advertisement

सोशल मीडियावर ईशितला ट्रोल केलं जात असतानाच एका प्रसिद्ध गायिकेने ईशितची बाजू घेतली आहे. साऊथची लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी केवळ १० वर्षांच्या मुलाला ट्रोल करणाऱ्या या ट्विटर गँगला चांगलेच फटकारले आहे.

ईशितची बाजू घेण्यासाठी मैदानात उतरली चिन्मयी श्रीपदा

आपल्या बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिन्मयी श्रीपादा यांनी 'X' वर ईशितचा फोटो पोस्ट करत पुढे अत्यंत कठोर शब्दांत टीका करत त्यांनी लिहिलं, "लोक या मुलाला इंटरनेटवरील सर्वांत जास्त द्वेष मिळवणारा मुलगा आहे. पण मुळात हे ट्विटरवरचे लोक सर्वात गलिच्छ, बदनामी करणारे आणि शिवीगाळ करणारे आहेत."

advertisement

चिन्मयी यांनी ट्रोलर्सच्या ढोंगीपणावर जोरदार हल्ला चढवत लिहिले, "जेव्हा खोकल्याच्या औषधाने लहान मुलांचा जीव गेला, तेव्हा यापैकी एकानेही तोंड उघडले नाही. पण हो, एका लहान मुलाला निशाणा बनवणे! हे संपूर्ण इकोसिस्टीमबद्दल बरेच काही सांगून जाते. हे सगळे लोक एका अतिउत्साही मुलाला लक्ष्य करत आहेत, पण हे स्वतः किती भयानक गुंडासारखे वागतात." या ट्विटमधून चिन्मयी यांनी ट्रोल करणाऱ्यांना आरसा दाखवला आहे.

advertisement

साऊथ सिनेमाची प्रसिद्ध पार्श्वगायिका असलेल्या चिन्मयी यांनी 'गुरु' चित्रपटातील 'तेरे बिना' आणि 'चेन्नई एक्सप्रेस'मधील 'तितली' यांसारखी सुपरहिट हिंदी गाणी गायली आहेत.

ईशितने ट्रोल होण्यासारखं केलं तरी काय?

चिल्ड्रन स्पेशल एपिसोडमध्ये हॉटसीटवर बसलेल्या ईशितने, अमिताभ बच्चन यांनी नियम सांगायला सुरुवात करताच, "मला नियम माहीत आहेत, त्यामुळे तुम्ही आता मला नियम समजावत बसू नका," असे म्हटले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

पुढे 'रामायण'शी संबंधित २५,००० पॉईंट्सच्या प्रश्नावर जेव्हा बिग बींनी त्याला सावध केले, तेव्हा ईशितने "अहो, लॉक करा!" असे घाईने सांगितले. दुर्दैवाने, त्याने निवडलेले उत्तर चुकीचे ठरले आणि तो कोणतीही रक्कम न जिंकता शोमधून बाहेर पडला.

मराठी बातम्या/मनोरंजन/
KBC Junior : 'तेव्हा हे गलिच्छ लोक गप्प होते...', ईशित भट्टला ट्रोल करणाऱ्यांवर बरसली बॉलिवूड सिंगर, सगळा माज उतरवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल