अमिताभना केले रीप्लेस
'मेरी जंग' असं सिनेमाचं नाव आहे. आधी या सिनेमाचं नाव सतरंग ठेवण्यात आलं होतं. त्यात अमिताभ लीड करणार होते. जया प्रदा नायिका होत्या. अमरीश पुरी खलनायक होते. त्यांचा मुलगा अनिल कपूर दाखवार होते. त्याच वेळेस अमिताभ यांची तब्येत ठीक नव्हती. ते राजकारणातही प्रवेश करणार होते त्यामुळे त्यांनी हा सिनेमा नाकारला. अमिताभ यांनी सिनेमा सोडल्याने जया प्रदा यांनीही हा सिनेमा सोडला.
advertisement
दिवाळीत पहाटे साडेचार वाजता अमिताभ बच्चनची विचित्र पोस्ट; म्हणाले,"मोज्यावर iPhone...'
सिनेमाचे नाव बदलले
एनएल सिप्पीने या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी जबाबदारी सुभाष घई यांच्याकडे सोपवली होती. स्क्रीप्टवरती काम सुरु झाले. या सिनेमाचे नाव बदलून 'मेरी जंग' ठेवण्यात आले. नव्या हीरोसाठी पहील्यांदा शत्रुघ्न सिन्हा यांना विचारले असता त्यांनी नकार दिला. सुभाष घई यांनी अनिलला मशाल सिनेमात पाहिले होते. ते त्याच्या अभिनयावर खूप खूश झाले होते. त्यांनी अनिल कपूरला डायरेक्ट हीरो करुन टाकले.
अनिल कपूरचे करियर
अनिल कपूर म्हणाला, "अमिताभ यांनी या सिनेमाला नकार दिला नसता तर मला ही संधी मिळाली नसती" त्यानंतर खरंच अनिल कपूरचे करिअर बदलले. त्या सिनेमातील कोर्टरुम मधील सीन ,संवाद फेक, भावनिकता याने सगळ्यांचे मन जिंकले होते. अनिल कपूरच्या करियर मधील एक दिशा देणारा सिनेमा होता.