दिवाळीत पहाटे साडेचार वाजता अमिताभ बच्चनची विचित्र पोस्ट; म्हणाले,"मोज्यावर iPhone...'

Last Updated:

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी दिवाळीत पहाटे चाडेचार वाजता एक विचित्र पोस्ट शेअर केली आहे.

News18
News18
Amitabh Bachchan : देशभरात दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीदेखील आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. अशातच अमिताभ बच्चन यांनी दिवाळीत पहाटे चाडेचार वाजता एक विचित्र पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टच्या माध्यमातून बिग बींनी चाहत्यांना विचार करायला भाग पाडलं आहे. अमिताभ यांनी ट्विस्टरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा चेहरा दिसत नसला तरी मोजे घातलेल्या पायांचा फोटो आणि त्यांच्या फोनची सावली दिसत आहे. हा फोटो शेअर करण्यासह त्यांनी एक मजेशीर कॅप्शनदेखील लिहिलं आहे.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट काय?
अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"मोज्यावर iPhone ; iPhone खाली मोजा समजत नाही ओ भैया, आपण काय शोधलं अअअअअअ कु कु कु कु कु uuuuu." या पोस्टवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया मजेशीर रिअ‍ॅक्शन पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहिलं, "कोणता आयफोन, कोणता मोजा?" दुसऱ्या युजरने अभिनेता अमिताभ बच्चन यांचाच एक मीम शेअर केला, ज्यावर लिहिलं होतं, "अशा पोस्टसाठी आपण तुम्हाला सलाम ठोकतो." तिसऱ्या युजरने लिहिलं, "अरे मला तर चक्कर यायला लागली आहे."
advertisement
अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमुळे लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे पहिल्यांदाच झालेलं नाही यापूर्देखील बिग बींनी सोशल मीडियावर आपल्या गाडीचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये समोरच्या काचेला लटकत असलेली 'लाबूबू' नावाची बाहुली दिसत होती. व्हिडीओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिलं होतं,"देवींनो आणि सज्जनहो, सादर आहे 'लाबूबू', आता माझ्या कारमध्ये सुद्धा." त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
advertisement
नुकत्याच पार पडलेल्या 70व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बच्चन कुटुंबाला सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांचा सन्मान करण्यात आला. फिल्मफेअरच्या 70 वर्षांच्या पूर्णतेनिमित्त जयांना सन्मानित करण्यात आलं, अभिषेकला 2025 चा सर्वोत्तम अभिनेता (बेस्ट अ‍ॅक्टर) म्हणून पुरस्कार मिळाला आणि बिग बींनाही फिल्मफेअरच्या या 70 वर्षांच्या सोहळ्यात खास सन्मान देण्यात आला. अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
दिवाळीत पहाटे साडेचार वाजता अमिताभ बच्चनची विचित्र पोस्ट; म्हणाले,"मोज्यावर iPhone...'
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement