Pune Politics : समीर पाटील यांच्याकडून रवींद्र धंगेकरांची कोंडी, 50 कोटींच्या नोटीसनंतर ठोकला अण्णांविरोधात शड्डू!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol : समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकरांविरोधात क्रिमिनल केस आणि दिवाणी दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने आपल्यावर केलेल्या आरोपांविरोधात समीर पाटील यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकरांविरोधात क्रिमिनल केस आणि दिवाणी दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर धंगेकरांनी थेट मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे.
50 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस
गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर यांनी समीर पाटील यांच्या विरोधात जी वक्तव्ये करत आहेत, त्यांचा कोणताही संदर्भ अथवा पुरावा नाही, असे समीर पाटील यांचे म्हणणे आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी तसेच त्यांच्या व्यावसायिक व व्यक्तिगत नुकसान आणि मानहानीसंदर्भात हे दावे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी, समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना 50 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती, पण आता प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले आहे.
advertisement
जमीन चोर निघाला मुरलीधर... - रवींद्र धंगेकर
रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला. काय म्हणता धंगेकर , जमीन चोर निघाला मुरलीधर, असं ट्विट धंगेकर यांनी केलं आहे. Stay tuned.. म्हणत धंगेकरांनी उत्सुकता देखील शिगेला पोहोतचली आहे. गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आलेल्या जमिनीत मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा दावा करण्यात आला आहे.(Jain boarding hostel) याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत.
advertisement
काय म्हणता धंगेकर ,
जमीन चोर निघाला मुरलीधर..!
Stay tuned..!#saveHND #punelandscam @ANI
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 18, 2025
मी गप्प बसणार नाही
दरम्यान, समीर पाटलांचा विषय सुटण्यासारखाच नाही. निलेश घायवळ सापडत नाही आणि समीर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. हा समीर पाटील प्लॅनर आहे. शहरातील पबपासून ते ड्रग्सपर्यंतचे अर्थकारण समोर येईल. समीर पाटील हा त्यांचा पीए नव्हता, तर दुसरंच काही तरी निघाला. त्याला मी उत्तर देणारच आहे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 19, 2025 12:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Politics : समीर पाटील यांच्याकडून रवींद्र धंगेकरांची कोंडी, 50 कोटींच्या नोटीसनंतर ठोकला अण्णांविरोधात शड्डू!