Pune : पुण्यात मध्यरात्री तरुणांचा दारुच्या नशेत धिंगाणा, पोलिसांनी उतरवला माज, पाहा VIDEO
Last Updated:
Pune Police News : रात्रीच्या वेळी रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी प्रसाद दिला. नागरिकांनी पोलिसांच्या या वेगळ्या आणि गोड पद्धतीचे कौतुक केले.
पुणे : पुणे शहरातील मुख्य परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या काही तरुणांना पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन केवळ आवाजच नाही तर इतर नागरिकांना त्रास देणारे वर्तन केल्याने परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. अखेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना थेट प्रसाद दिला.
पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांनी मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर रस्त्यावरच गाडी उभी करून मोठ्या आवाजात गाणी लावली, आरडाओरडा करत नाचगाणं सुरू केलं. काहींनी दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकून गोंधळ घातला. या प्रकारामुळे नागरिकांना त्रास झाला. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी ताबडतोब या तरुणांना आवरलं, त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि गाडी जप्त केली. संबंधितांवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनतळ नियमभंगाबाबतही कारवाई सुरू आहे. पोलिसांनी या तरुणांना चौकीत नेऊन समज दिल्यानंतर त्यांच्याकडून माफीनामा देखील घेतला असल्याचे समजते.https://www.instagram.com/reel/DP7qVrjEhBs/?igsh=dzZ6cm8wYXNuZG53
advertisement
या संपूर्ण कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. रात्री अशा प्रकारचे उपद्रव करणाऱ्यांवर कारवाई झाल्याने आता थोडासा दिलासा मिळाला आहे,असे नागरिकांनी सांगितले. सोशल मीडियावरही या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, अनेकांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन उपद्रव केल्यास कठोर कारवाई केली जाईल. शहरातील शिस्त आणि शांतता राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 12:07 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्यात मध्यरात्री तरुणांचा दारुच्या नशेत धिंगाणा, पोलिसांनी उतरवला माज, पाहा VIDEO