पूजा सामंत हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या,"अमिताभ आणि रेखा यांच्यात एक आकर्षण नक्कीच असावं. अमिताभ यांच्यासाठी रेखा यांनी शाकाहारी होणं पसंत केलं होतं. दुसरीकडे ऋषि कपूर आणि नीतू सिंह यांच्या लग्नात रेखा भांगेत कुंकू लावून गेल्या तेव्हा तर सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं. नवरा-नवरीला सोडून सर्व कॅमेरे रेखा यांच्याकडे वळले होते.
advertisement
एक किस्सा शेअर करत पूजा म्हणाल्या,"जया यांनी एकदा रेखा यांना आपल्या घरी जेवायला बोलावलं होतं". या भेटीदरम्यानच त्यांनी 'मिसेस बच्चन' असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यानंतर अमिताभ आणि रेखा आणि एकत्र काम करणं बंद केलं होतं. अमिताभ, रेखा आणि जया यांच्यापैकी रेखा यांनीच याबद्दल बोलायला पसंती दर्शवली आहे. महानायक अमिताभ बच्चन मात्र नेहमीच याबद्दल बोलणं टाळत आले आहेत. जया बच्चन यांनी मीडियापासून दूर राहणं पसंत केलं. मी अनेकदा अमिताभ बच्चन यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पण रेखा यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांनी नेहमीच नकार दिला आहे".
जया बच्चन या भारतीय मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत राजकारणीदेखील आहेत. हिंदी चित्रपटांसह बंगाली चित्रपटांतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आतापर्यंत त्यांना आठ फिल्मफेअर, पद्मश्री आणि भारत सरकारद्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या चौथ्या-सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.
1970 च्या दशकात अमिताभ आणि रेखा यांचं नाव एकत्र जोडलं गेलं. त्यांच्या सिलसिला या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. आजही हे नातं बॉलिवूडमधील सर्वात चर्चित आणि रहस्यमय नात्यांपैकी एक मानलं जातं.