धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन जगतासह लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच न भरून निघणारी आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र मैत्रिणी, कलाकार त्यांच्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करक आहेत. त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहकलाकार म्हणजे अमिताभ बच्चन. जय आणि विरूची जोडी अजरामर झाली. तशीत धर्मेंद्र आणि अमिताभ यांची मैत्री ही अजरामर झाली. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर एक युगाचा अंत झाला.
advertisement
अत्यंत जवळचा मित्र गमावल्याचं बिग बींना प्रचंड दु:ख झालं. धर्मेंद्र यांच्या अत्यंसंस्काराला अमिताभ यांनी हजेरी लावली होती. वीरूच्या जाण्याने मध्यरात्री अमिताभ बच्चन यांनी भावुक पोस्ट शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. ज्या शोले सिनेमानं जय आणि विरूची जोडी हिट केली. त्या सिनेमाला याच वर्षी 50 वर्ष पूर्ण झाली. हा सिनेमा काही दिवसांत री रिलीज होणार आहे. अशातच धर्मेंद्र यांचं जाणं अमिताभ बच्चन यांना हताश करून गेलं. त्यांच्यासाठी धर्मेंद्र हे केवळ सह-कलाकार नव्हते तर भावासारखे होते.
जय-वीरूची जोडी 50 वर्षांनी विभक्त झाली
धर्मेंद्रच्या अंत्यसंस्काराला अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेकसह उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप दिल्यानंतर पहाटे 2:30 वाजता एक्स वर पोस्ट केली आहे. त्यांच्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, "आणखी एक धाडसी दिग्गज आपल्याला सोडून गेला आहे. तो स्टेज सोडून गेला आहे. एक शांतता मागे सोडली आहे. एक शांतता जी सहन करणे खूप कठीण आहे. धरम जी... महानतेचे एक प्रतीक केवळ त्यांच्या महान उंचीसाठीच नव्हे तर त्यांच्या मोठ्या हृदयासाठी आणि साधेपणासाठी देखील ओळखले जाते."
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "पंजाबच्या ज्या गावातून ते आले होते त्या गावाच्या मातीचा सुगंध त्यांच्यासोबत आणला आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ते त्या निसर्गाशी प्रामाणिक राहिले. एक असे क्षेत्र जे प्रत्येक दशकात बदलत गेले. चित्रपट उद्योग बदलला, पण तो कधीही बदलला नाही. त्याचे हास्य, त्याचे आकर्षण आणि त्याची आपुलकी, जी त्याच्या सभोवतालच्या प्रत्येकापर्यंत पोहोचली. अशी व्यक्ती या व्यवसायात दुर्मिळ आहेत. आमच्यातील आयुष्यात एक पोकळी, एक जागा आता रिकामी झाली आहे. एक पोकळी जी नेहमीच राहील. प्रार्थना."
