अमृतानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, "पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आमचा 'नियम व अटी लागू' नाटकाचा प्रयोग आहे. गेली कित्येत प्रयोग मी हे अनुभवतेय आणि मला खात्री आहे की खूपजण हे अनुभवत असणार. पुण्यातील असे कित्येक थिएटर आहेत जे अतिशय छान मेन्टेन केले आहेत. बालगंधर्व रंगमंदिराची नेहमीची रड आहे. इतके घाणेरडे वॉशरूम्स असतात. बॅकस्टेजला एन्ट्री केली सगळीकडे वास यायला लागतात. VIP रूम्स सजावट करून तिथे जो पैसे ओतला जातो त्यापेक्षा इथल्या वॉशरूमची मॅनेजमेन्ट सुधरावी अशी एक माफक अपेक्षा आहे. रूममधले अटॅच वॉशरूम, बाथरूम्स आहेत त्याची इतकी बिकट अवस्था आहे की, इथले सफाई कर्मचारी जे आहेत ते प्रयोग सुरू होण्याच्या पाच मिनिटं आधी आले आहेत."
advertisement
( 'मला त्याचा खूप राग आलाय', अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात, पोस्ट शेअर करत संताप व्यक्त )
अमृताने सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते अमृताशीच हुज्जत घालताना दिसले. अमृता पुढे म्हणाली, "सफाई कर्मचारी पाट्या टाकून गेले. इतकं जुनं रंगमंदिर आहे जिथे सतत प्रयोग होत असतात, सतत मोठी लोक येत असतात, कित्येक लोक परफॉर्म करत असतात, पॉलिटिकल कार्यक्रम असतात तरीही इथे इतकी दयनीय अवस्था कायम बालगंधर्व रंगमंदिराची असते. याला जबाबदार कोण हे त्या त्या मॅनेजमेन्टने बघितलं पाहिजे."
अमृता व्हिडीओसह एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलंय, "आर्टिस्ट येतात, मनापासून प्रयोग करतात, निघून जातात...म्हणून किती गृहीत धरावं @pmccarepune @pmc_pune ने ?? साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात.. प्रेक्षक नाटकाच्या प्रेमापोटी येतात, जातात..त्यांना पण असंच गृहीत धरायचं ?? कधी बदलणारे ही परिस्थिती ? सांस्कृतिक शहर म्हणायचं आणि तिथल्या एका नावाजलेल्या नाट्यगृहाची ही अवस्था?"
अमृताच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळींनी या गोष्टीचं समर्थन केलं आहे. अनेकांनी असे अनुभव घेतल्याचं सांगितलं आहे. अमृताच्या व्हिडीओनंतर बालगंधर्व रंगमंदिरातील सोयी सुविधा बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
