'अॅनिमल' च्या एवढ्या यशाने संदीप रेड्डी वंगा यांच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे आतापर्यंत फक्त तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि तिन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंग' नंतर 'अॅनिमल' हा त्याचा तिसरा ब्लॉकबस्टर आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, दररोज प्रचंड कमाई करणाऱ्या 'Animal' ने 10 डिसेंबर म्हणजेच दुसऱ्या रविवारी सुमारे 36 कोटी रुपये कमावले आहेत. अशा प्रकारे चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला.
advertisement
'मला नीट लिहिता-वाचता...' लहानपणापासून या गंभीर आजाराशी झुंज देतोय सनी देओल; केला धक्कादायक खुलासा
या चित्रपटाने आतापर्यंत 431.27 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये या चित्रपटाने हिंदीतून सर्वाधिक म्हणजे 388.37 कोटी कमाई केली आहे. आतापर्यंत तेलगू भाषेतून 38.8 कोटी रुपये, तामिळमधून 3.43 कोटी रुपये, कन्नड भाषेतून 56 लाख रुपये आणि मल्याळम भाषेतून 12 लाख रुपये जमा झाले आहेत. आता देशभरातील 'अॅनिमल'चे एकूण कलेक्शन 513.75 कोटींवर पोहोचले आहे.
अर्थात, एक मोठा वर्ग 'अॅनिमल'वर बरीच टीका करत आहे, पण याच वादाचा चित्रपटाला फायदाच होताना दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही 'अॅनिमल' च्या कमाईत घसरण न होता वाढच झाली आहे.
'Animal' च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, 'Animal' ने 9 दिवसात 660 कोटी रुपयांचे कमाई केली होती आणि आता 10 व्या दिवशी चित्रपटाने 717 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'गदर 2' ने जगभरात पूर्ण कलेक्शन 686 कोटी रुपये झालं होतं. अशाप्रकारे 'अॅनिमल' ने दहाव्या दिवशीच गदर 2'चा मागे टाकलं आहे. 'अॅनिमल'मध्ये रणबीरशिवाय बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी, सुरेश ओबेरॉय आणि प्रेम चोप्रा यांच्या भूमिका आहेत. अॅनिमल' च बजेट 100 कोटी रुपये आहे. त्यामुळे चित्रपट आता सुपरहिट झाल्याचं बोललं जातंय.