filmygyan ला दिलेल्या मुलाखतीत अनुरागला विचारण्यात आलं की, “तुम्हाला विराट कोहलीवर बायोपिक बनवायला आवडेल का?” त्यावर तो म्हणाला, "विराट कोहली आधीच सुपरस्टार आहे. तो लाखो लोकांचा हिरो आहे. त्याचं आयुष्य लोकांना माहित आहे. माझ्या मते, बायोपिक त्या व्यक्तींवर व्हायला हवेत ज्यांनी मोठं काम केलंय, पण ज्यांच्याबद्दल जगाला माहितीच नाही.”
हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा रचित सिंग?
advertisement
अनुराग पुढे म्हणाले की, “मी विराटला चांगलं ओळखतो. तो खूप भावनिक, प्रेरणादायी आणि अविश्वसनीय व्यक्ती आहे. पण जर मला बायोपिक बनवायचाच असेल तर मी अशा व्यक्तीवर करेन ज्याने समाजासाठी काहीतरी मोठं काम केलंय, पण तो अजूनही गुप्त आहे. लोक त्याचं नावसुद्धा ओळखत नाहीत.”
अनुराग कश्यप यांचे हे विधान ऐकून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. अनेकांना वाटलं होतं की ते विराटसारख्या मोठ्या स्टारवर बायोपिक करायला तयार होतील. पण दिग्दर्शक मात्र त्यांची ओळख सांगणाऱ्या अनामिक लोकांच्या कहाण्या मोठ्या पडद्यावर आणू इच्छितात.
कामाबद्दल बोलायचं झालं तर अनुराग कश्यप सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘निशांची’ मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात बाळ ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आणि अभिनेत्री वेदिका पिंटो मुख्य भूमिकेत आहेत.