TRENDING:

अरबाजच्या दुसऱ्या लग्नात मुलाचं गाणं, नव्या वहिनीबरोबर भाईजाननं धरला ठेवा, Video

Last Updated:

भावाच्या दुसऱ्या लग्नात सलमान खानचा डान्स करतानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 25 डिसेंबर : अभिनेता अरबाज खान यानं वयाच्या 57व्या वर्षी दुसरं लग्न केलं. गर्लफ्रेंड शौराबरोबर अरबाजनं दुसरं लग्न केलं. अरबाजच्या लग्नाला संपूर्ण खान कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील जवळच्या मित्र मैत्रिणींनी उपस्थिती लावली होती. ख्रिसमसच्या मुहूर्तावर अरबाजचं लग्न करत डबल सेलिब्रेशन केलं. अरबाजच्या लग्नात सगळेच आनंदाच सहभागी झाले होते. बहिण अर्पिताच्या घरी अरबाजच्या लग्नाची तयारी करण्यात आली होती. मोठ्या धुमधडक्यात अरबाजचं दुसरं लग्न पार पडलं. अरबाजच्या लग्नात त्याच्या मुलानं खास गाणं देखील सादर केलं. इतकंच नाही स्वत: भाईजान देखील नव्या वहिनीबरोबर नाचताना दिसला.
नव्या वहिनीबरोबर भाईजाननं धरला ठेवा
नव्या वहिनीबरोबर भाईजाननं धरला ठेवा
advertisement

अरबाजनं याआधी अभिनेत्री मलायका अरोराबरोबर लग्न केलं होतं. 1998साली मलायका आणि अरबाज यांचं लग्न झालं होतं. 19 वर्षांचा संसार मोडून त्यांनी 2017साली घटस्फोट घेतला. अरबाज आणि मलायका यांना अरहान हा मुलगा आहे. अरहान वडिलांच्या दुसऱ्या लग्नात आनंदानं सहभागी झाला होता. अरहाननं बाबा आणि नव्या आईसाठी खास गाणं देखील सादर केलं. आपल्या दुसऱ्या लग्नात गाण सादर करणाऱ्या अरहानचा स्वत: अरबाजनं व्हिडीओ देखील शुट केला. बाप लेकानं 'तेरे मस्त मस्त दो नैन' हे गाणं गायलं.

advertisement

हेही वाचा - एक्स नवऱ्याच्या लग्नाच्या रात्री कुठे होती मलायका अरोरा, रस्त्यावरील 'तो' व्हिडीओ समोर

इतकंच नाही तर अभिनेता सलमान खान देखील भावाच्या नव्या संसारासाठी प्रचंड खुश होता. भावाची नवी बायको आणि आपली नवीन वहिनी शौराबरोबर भाईजाननं ठेका धरला. भाईजाननं पठाण स्टाइल ग्रे कलरचा कुर्ता परिधान केला. 'दिल दिया गल्ला' या गाण्यावर भाईजान थिरकला. 'तेरे मस्त मस्त दो नैन' गाण्यावर भाईजाननं भाच्याबरोबर हुक स्टेप देखील केली.

advertisement

भावाच्या दुसऱ्या लग्नात सलमान खानचा डान्स करतानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'अनेक दिवसांनी भाईजानला हसताना पाहिलं', 'भावासाठी भाईजान खुश आहे', असं म्हणत अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी 'आता भाईजानचं देखील लग्न लावून द्या' असं म्हटलं आहे.

अरबाजच्या नव्या बायकोचं खान कुटुंबानं ग्रँड वेलकम केलं. संपूर्ण खान कुटुंब शौराच्या वेलकमसाठी एकत्र आलं होतं. चार लेअरचा केक कटिंग करत मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं. मुलगा अरहाननं देखील नव्या आईबरोबर फोटो क्लिक केले.

मराठी बातम्या/मनोरंजन/
अरबाजच्या दुसऱ्या लग्नात मुलाचं गाणं, नव्या वहिनीबरोबर भाईजाननं धरला ठेवा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल