बहिणीच्या घरी सुरू होतं अरबाजचं दुसरं लग्न, अर्ध्या रात्री रस्त्यावर मलायका...,Video व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
1998साली मलायका आणि अरबाज यांचं लग्न झालं होतं. 2016साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2017मध्ये त्यांचा घटस्फोट घेतला.
मुंबई, 25 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खान यानं नुकतंच लग्न केलं. अरबाजचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्यानं अभिनेत्री मलायका अरोराबरोबर लग्न झालं होतं. पण 2017साली त्यांचा घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या 6 वर्षांनी अरबाजनं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. अरबाजनं गर्लफ्रेंड शौराबरोबर लग्न केलं. बहिण अर्पिताच्या घरी अरबाजच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घालण्यात होता. नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नावेळी अभिनेत्री मलायका काय करत होती माहितीये का? मलायकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता अरबाज खान एकीकडे आपली गर्लफ्रेंड शौराबरोबर लग्न करत होता. तर दुसरीकडे त्याची पहिली बायको मलायका आरोरा ख्रिसमस पार्टी एन्जॉय करत होती. सोशल मीडियावर मलायका एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात रात्री उशिरा फॅमिलीबरोबर स्पॉट झाली. तिनं पापाराझींना पोझेस देखील दिल्या.
हेही वाचा - 'तो काळ आयुष्यातील सर्वात...' ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपनंतर अशी झाली होती विवेक ओबेरॉयची अवस्था
advertisement
अरबाजच्या लग्नाच्या रात्री ख्रिसमस पार्टी एन्जॉय करणारी मलायका फॉर्मल ब्लेजर आणि व्हाइट आउटफिटमध्ये दिसली. मलायकानं तिच्या केसांना लाल रंगाची रिबीन लावली होती. हाय हिल्स घालून मलायकानं तिचा लुक पूर्ण केलाहोता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायका तिच्या कारकडे जाताना दिसतेय. त्याआधी ती पापाराझींना पोझेस देतेय.
advertisement
1998साली मलायका आणि अरबाज यांचं लग्न झालं होतं. 2016साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2017मध्ये त्यांचा घटस्फोट घेतला. दोघआंना अरहान हा मुलगा देखील आहे. अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अभिनेता अर्जून कपूरला डेट करतेय.
अरबाजच्या दुसऱ्या लग्नाला मलायका जरी उपस्थित राहिली नसली तरी मुलगा अरहान वडिलांच्या दुसऱ्या लग्नात सहभागी झाला होता. अरहानचे नव्या आईबरोबरचे काही फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2023 10:42 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बहिणीच्या घरी सुरू होतं अरबाजचं दुसरं लग्न, अर्ध्या रात्री रस्त्यावर मलायका...,Video व्हायरल