'तो काळ आयुष्यातील सर्वात...' ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपनंतर अशी झाली होती विवेक ओबेरॉयची अवस्था

Last Updated:

एका मुलाखतीत विवेकला ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला होता.

विवेक ओबेरॉय
विवेक ओबेरॉय
मुंबई, 24  डिसेंबर :   बॉलिवूडची लोकप्रिय जोडी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात काही दिवसांपासून दुरावा आल्याची चर्चा आहे. मध्यंतरी ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाचा राहता बंगला सोडून गेली असल्याची माहिती समोर आली होती. तसेच दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ऐश्वर्या अभिषेकसोबत लग्नाआधी बॉलिवूडच्या एका हिरोसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हा अभिनेता होता विवेक ओबेरॉय. या अभिनेत्यानं आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकदा मोकळेपणानं भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत विवेकला ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला होता.
खरंतर, एकेकाळी विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या लिंकअपच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय त्याला डेट करत असल्याचा खुलासा खुद्द विवेक ओबेरॉयनेच केला होता. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. 2003 मध्येच विवेक आणि ऐश्वर्या वेगळे झाले. दरम्यान आता अभिनेत्याने बरेच दिवसांनी याबद्दल मौन सोडलं आहे. या नात्याचा शेवट का झाला, या दोघांत नक्की काय नातं होतं याबद्दल विवेकने खुलासा केला होता.
advertisement
'माझी चूक झाली...माफ करा' Animal चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगांनी का मागितली प्रेक्षकांची माफी?
या नात्याबाबत एका मुलाखतीत विवेक ओबेरॉयला विचारण्यात आले की, ‘करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऐश्वर्या रायसोबतच्या नात्याबद्दल सार्वजनिकपणे चर्चा करणे योग्य होते का?’ याला उत्तर देताना विवेकने थेट उत्तर दिले. विवेक म्हणाला कि, ‘त्या सर्व गोष्टी घडून गेल्या आहेत, आता मी त्यावर काहीही बोलणार नाही. कारण, जर तुम्हाला तुमच्या वाटत असेल की कुणीही तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये आणि तुम्ही तितके संवेदनशील असाल तर स्वतःच त्याबद्दल बोलणं टाळा.’
advertisement
ऐश्वर्याबद्दल बोलताना विवेक पुढे म्हणाला, 'माझं जेव्हा ऐश्वर्याशी ब्रेकअप झालं, तेव्हा केवळ माझ्या वैयक्तिक आयुष्यातच नाही तर फिल्मी करिअरमध्येही खूप नुकसान झालं होतं. मी तब्बल 18 महिने रिकामा बसलो होतो. मी इतके चांगले चित्रपट देऊनही मला काम मिळत नव्हतं. माझ्या आयुष्यातील तो टप्पा इतका वाईट होता की मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.'
advertisement
विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला, तो काळ असा होता की बॉलीवूडवर फक्त 5-10 लोकांचं नियंत्रण होतं आणि जर कोणाबद्दल काही गैरसमज असेल तर त्याला काम मिळायचं नाही. पण आता ओटीटी आल्यानंतर परिस्थिती खूप बदलली आहे. खरं तर माझ्याबरोबर जे काही घडलं त्याबद्दल माझ्या मनात कटुता नाही, कारण मला पत्नी प्रियांका आणि आईचा खूप पाठिंबा आहे.' असा खुलासा त्याने केला होता.
advertisement
विवेकने 2010 मध्ये प्रियंका अल्वाशी लग्न केलं, त्यांना दोन अपत्ये आहेत. विवेक ओबेरॉयने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, त्यात ‘कंपनी’, ‘साथिया’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. पण एक वेळ अशी आली की विवेकच्या सर्वच चित्रपटांना फटका बसू लागला, त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ लागली आणि त्याला काम मिळणं अवघड झालं. बराच काळ त्याला घरीच बसून राहावं लागलं, परिणामी त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागला. पण त्यानंतर विवेकने ओटीटी विश्वातून आपल्या करिअरमध्ये दमदार कमबॅक केलं. तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टीसोबत झळकणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तो काळ आयुष्यातील सर्वात...' ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपनंतर अशी झाली होती विवेक ओबेरॉयची अवस्था
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement