'माझी चूक झाली...माफ करा' Animal चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगांनी का मागितली प्रेक्षकांची माफी?

Last Updated:

'अ‍ॅनिमल' चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगांनी मात्र त्यांच्या एका चुकीसाठी प्रेक्षकांची माफी मागितली आहे. असं काय घडलं नेमकं जाणून घ्या.

संदीप रेड्डी वंगा
संदीप रेड्डी वंगा
मुंबई, 24  डिसेंबर : संदीप रेड्डी वंगा यांचा नुकताच आलेला 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट भारतासह जगभरात प्रचंड गाजला. पण या चित्रपटावर टीका करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कलाकारांसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यवर निशाणा साधला जात आहे. त्यांचे याआधीचा चित्रपट कबीर सिंगवर देखील टीका झाली होती. पण या अभिनेत्याने नेहमीच आपल्या चित्रपटात दाखवलेल्या हिंसेचं आणि दृष्टिकोनाचं समर्थन केलं. 'अ‍ॅनिमल' नंतर त्याचा पुढचा भागही येणार आहे. त्यात या चित्रपटापेक्षा जास्त हिंसक दृश्य असल्याचं बोललं जातंय. त्याआधी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगांनी मात्र त्यांच्या एका चुकीसाठी प्रेक्षकांची माफी मागितली आहे. असं काय घडलं नेमकं जाणून घ्या.
'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरच्या ऑन-स्क्रीन पत्नीची भूमिका गीतांजलीची भूमिका करणाऱ्या रश्मिका मंदान्ना हिने साकारली होती. मात्र, रश्मिका ही दिग्दर्शक संदीपची पहिली पसंती नव्हती अशी माहिती समोर आली. रश्मिका ऐवजी चित्रपटात बॉलिवूडची दुसरीच अभिनेत्री दिसली असती. पण ऐनवेळी तिला रिप्लेस करून चित्रपटात रश्मिकाची एंट्री झाली. आता त्याविषयी संदीप रेड्डी वांगांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
'हे यश पाहून कलाकार म्हणून त्रास होतो...' 'त्या' भूमिकेविषयी उपेंद्र लिमयेनी व्यक्त केली खंत
संदीप रेड्डी जेव्हा 'अ‍ॅनिमल' बनवत होते, तेव्हा त्यांनी गीतांजलीच्या भूमिकेसाठी रश्मिका नाही तर परिणीती चोप्राला कास्ट केलं होतं. पण शेवटच्या क्षणी त्यांनी परिणीतीला रिप्लेस केलं. नुकताच संदीपने याविषयी खुलासा केला आहे. कोमल नाहटा यांना दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'खरंतर ती माझीच चूक आहे. मी तिला म्हणाली, 'शक्य असेल तर मला माफ कर.' मी तिला दीड वर्षांपूर्वी साइन केले होते, पण शूटिंगच्या आधी काही कारणामुळे मला तिच्यात गीतांजलीची झलक दिसली नाही. काही भूमिका काही लोकांना सूट करत नाहीत.' असा खुलासा त्यांनी केला.
advertisement
संदीप रेड्डी वंगा यांनी पुढे सांगितले की परिणीतीने आपला निर्णय सांगितल्यावर तिची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही खुलासा केला आहे. संदीप म्हणाले, 'मी ऑडिशनवर कधीच विश्वास ठेवत नाही. माझा फक्त माझ्या इच्छेवर विश्वास आहे. पहिल्या दिवसापासूनच मी परिणितीच्या अभिनयाचा चाहता आहे. मला कबीर सिंगमध्येही प्रितीच्या भूमिकेत तिला कास्ट करायचं होतं, पण तेव्हाही ते घडू शकलं नाही. मला नेहमीच तिच्यासोबत काम करायचं होतं.'
advertisement
संदीप रेड्डी पुढे म्हणाले, तिला हे माहिती आहे. मी तिला म्हणालो, 'सॉरी. माझ्यासाठी चित्रपटापेक्षा मोठं काहीही नाही. त्यामुळे मी माझा निर्णय बदलून दुसऱ्या कलाकाराला कास्ट करत आहे. तिला वाईट वाटलं, पण मी असं का म्हणतोय हे तिने समजून घेतलं.' असं ती म्हणाली.
प्रितीची भूमिका शाहिद कपूर स्टारर 'कबीर सिंह' या चित्रपटात कियारा अडवाणीने साकारली होती. 2019 मध्ये प्रदर्शित झालेला संदीपचा हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझी चूक झाली...माफ करा' Animal चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगांनी का मागितली प्रेक्षकांची माफी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement