नेमकं प्रकरण काय?
आर्यन खान 28 नोव्हेंबर 2025 रोजी बेंगळुरूमधील एका पबच्या 'डी'याव्होल आफ्टर डार्क या इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक कलाकारमंडळीदेखील पबमध्ये उपस्थित होती. दरम्यान आर्यनला पाहून चाहत्यांनी आवाज केला. त्यावेळी पबच्या बाल्कनीत उभं राहून आर्यन खान चाहत्यांना मधलं बोट दाखवत आक्षेपार्ह वर्तन करताना दिसून आला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
आर्यनने हे आक्षेपार्ह वर्तन केलं त्यावेळी या कार्यक्रमात त्याच्यासोबत मंत्री जामीर अहमद थान यांचा मुलगा झैद खान आणि हॅरिस यांचा मुलगा नलपाडदेखील उपस्थित होता. मोहम्मद नलपाडसोबत आर्यन खान त्या पबमध्ये आला होता. आर्यन खानच्या आक्षेपार्ह कृतीवर झैद खान आणि मोहम्मद नलपाड यांनी हसत हसत त्यावर प्रतिक्रिया दिली. आर्यन खानच्या या वर्तनावर सध्या खूप टीका केली जात आहे. त्याने उपस्थित लोकांसोबत गैरवर्तन केलं असूनही त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नेटकरी बेंगळुरू पोलिसांना टॅग करत आर्यनवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
पोलिसांनी पबच्या व्यवस्थापकाची जवळपास तासभर चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन केले. आर्यन खानच्या वागणुकीला काय कारण होते हे समजण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पण अद्याप नक्की कारण समोर आलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याचं तपासात सिद्ध झाल्यास ते त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू इच्छितात.
आर्यन खानची 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही पहिली वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा आर्यन खानने सांभाळली होती. या सीरिजमध्ये शाहरुखसह अनेक बॉलिवूडकर झळकले होते.
