छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गाडीवाट नावाचे छोटसं गाव आहे. गावामध्ये जास्त लोकवस्ती नाही. गावात एक जिल्हा परिषदेची शाळा असून ती इयत्ता दहावीपर्यंत आहे. शाळेमध्ये नेहमीच वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम चालवले जातात. त्यापैकीच एक उपक्रम हा मुलांना जपानी भाषा शिकण्याचा आहे. आता इथले विद्यार्थी उत्तम प्रकारे जापनीजमध्ये बोलतात.
तुम्ही कधी पाहिले नसतील असे 200 अडकित्ते, प्राध्यापक सरांकडे अनोखा संग्रह
advertisement
शाळेत शिक्षक दादासाहेब नवपुते यांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. नवपुते सरांनी विद्यार्थ्यांना आधी ऑनलाईन क्लासमधून शिक्षण देण्याचं काम केलं. त्यानंतर जापनीजसाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली. आता जपानमधील टोकियो विद्यापीठातून विद्यार्थ्यांना जापनीज भाषेचे धडे दिले जातात, असं शिक्षक दादासाहेब नवपुते यांनी सांगितलं.
जे विद्यार्थी जापनीज भाषा शिकले आहेत, ते इतरांना भाषा शिकवण्याचं काम करतात. आतापर्यंत 200 विद्यार्थी एकदम उत्तम प्रकारे जापनीज भाषा शिकले आहेत. ते आज भाषा बोलतात त्यासोबत इथल्या अनेक विद्यार्थ्यांना जापनीज भाषा शिकून त्या ठिकाणी जाऊन नोकरी करायची, तिथले तंत्रज्ञान आहे ते आपल्या देशामध्ये कसे आणता येईल यासाठी हे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत असं सरांनी देखील आणि विद्यार्थ्यांना देखील सांगितलं आहे.
आज हीच मुले सहजपणे स्वतःची ओळख, दैनंदिन संभाषण आणि छोटे संवाद जपानी भाषेत बोलताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे पालकांसह परिसरातही कौतुकाची चर्चा होत आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे ग्रामीण भागातील शाळेतूनही जागतिक भाषा शिकता येते, हे गाडीवाट शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.





