छ. संभाजीनगरात तुफान राडा, ‘त्या’ प्रकरणाला वेगळं वळण, धक्का नव्हे तर ‘ती’ आहे खरं कारण!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajiangar: या संपूर्ण प्रकारामागे एका खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या तरुणीशी संबंधित मैत्रीचा वाद असल्याचे तपासात समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेस परिसरात रविवारी रात्री गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांमध्ये थरारक हिंसाचार उफाळून आला. “परत तुरुंगात जावे लागले तरी चालेल,” असे खुलेआम म्हणत एका तरुणाने हल्ला केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रविवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास चाकू व दांड्यांच्या सहाय्याने झालेल्या या हाणामारीत दोन्ही गटांतील तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार एकूण 20 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. तपासाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांच्याकडे देण्यात आली आहे.
advertisement
मुकुंदवाडी येथील रहिवासी पवन गिते (वय 20) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्याचा नातेवाईक शैलेश घुगे आणि विशाल खेत्रे, उत्कर्ष सोपारकर व गौरव वानखेडे यांच्यात वाद सुरू होता. या वादातून घुगे व त्याच्या मित्रांवर लाकडी दांड्यांनी मारहाण करण्यात आली. भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत असताना विशाल खेत्रेने “यालाही पकडा… आताच बाहेर आलो आहे, पुन्हा काही दिवस आत जाईन, पण याचा शेवट करतो,” असे म्हणत थेट हल्ला केल्याचा आरोप पवनने केला आहे.
advertisement
दरम्यान, विशाल येशू खेत्रे (वय 24, रा. अयोध्यानगर) याने दिलेल्या तक्रारीत वेगळाच दावा केला आहे. किरकोळ धक्क्यामुळे वाद वाढला आणि त्यानंतर शैलेश घुगे, पवन गिते व त्यांच्या तीन ते चार साथीदारांनी शिवीगाळ करत आपल्यावर मारहाण केली, असे त्याने म्हटले आहे. पवनने मानेवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चुकवताना हाताच्या दंडाला इजा झाल्याचे विशालने सांगितले.
advertisement
या संपूर्ण प्रकारामागे आकाशवाणी परिसरातील एका खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या तरुणीशी संबंधित मैत्रीचा वाद असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारणावरून दोन्ही बाजूंच्या तरुणांनी आपल्या ओळखीच्या गुंडांना बोलावले होते. कॅनॉट प्लेसमधील एका चहाच्या दुकानात तडजोडीसाठी सर्वजण एकत्र जमले होते. मात्र, तेथेच शाब्दिक वाद उफाळून आला. काहीजण निघून गेल्यानंतर रस्त्याच्या कोपऱ्यावर त्यांना अडवण्यात आले आणि त्यानंतरच हिंसक हाणामारीला सुरुवात झाली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:01 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
छ. संभाजीनगरात तुफान राडा, ‘त्या’ प्रकरणाला वेगळं वळण, धक्का नव्हे तर ‘ती’ आहे खरं कारण!







