झोपेतच झाला मृत्यू!
‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, रॉबर्ट रेडफोर्ड यांचा मृत्यू त्यांच्या प्रोवो येथील डोंगराळ भागात असलेल्या घरात झाला. ‘रॉजर्स अँड कोवान पीएमके’ या प्रसिद्धी संस्थेच्या सिंडी बर्जर यांनी सांगितलं की, ऑस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड यांचा मृत्यू झोपेतच झाला, ज्यामुळे त्यांचे चाहते अजूनच भावूक झाले आहेत.
advertisement
‘या’ चित्रपटांमुळे झाले अजरामर!
रॉबर्ट रेडफोर्ड यांनी त्यांच्या सहा दशकांच्या करिअरमध्ये जवळपास ५० चित्रपटांमध्ये काम केलं. १९६९ मध्ये आलेल्या ‘बुच कॅसिडी अँड द सनडांस किड’ या चित्रपटाने त्यांना जगभर ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘द स्टिंग’, ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ आणि ‘ऑर्डिनरी पीपल’ यांसारख्या चित्रपटांनीही ते अजरामर झाले. त्यांच्या करिअरमधला शेवटचा रोल ‘मार्व्हल स्टुडिओज’च्या ‘एवेंजर्स: एंडगेम’ या चित्रपटात होता, ज्यात त्यांनी एक छोटी भूमिका केली होती.
रॉबर्ट यांचा जन्म १९३६ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. सुरुवातीला त्यांना चित्रकार व्हायचं होतं, पण त्यांची आवड अभिनयात होती. त्यांनी २००२ मध्ये अकादमी मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय, त्यांनी जगप्रसिद्ध ‘सनडांस फिल्म फेस्टिव्हल’चीही स्थापना केली होती. त्यांच्या निधनाने हॉलीवूडने एक मोठा सुपरस्टार गमावला आहे.