मिरा-भाईंदर शहरात मोठ्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायचा पर्दाफाश झाला आहे. सेक्स रॅकेटमध्ये एक प्रसिद्ध बंगाली मॉडेल आणि अभिनेत्रीचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी या अभिनेत्रीविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरारोडच्या ठाकूर मॉलमध्ये हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. सापळा रचून पोलिसांनी हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आणलं. धक्कादायक बाब म्हणजे, एक प्रसिद्ध अभिनेत्री या सेक्समध्ये प्रमुख भूमिकेत आढळून आली आहे.
advertisement
दोन मुलींची केली सुटका
छापेमारीत बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का मोनी मोहनदास (मून दास) अशी ओळख पटवण्यात आलेली आहे. या अनुष्काच्या तावडीतून दोन तरुणी सुटका करण्यात आली आहे. या दोन्ही तरुणींना अनुष्काने चित्रपटात, टीव्ही सिरीयलमध्ये काम देते आणलं होतं. मात्र त्यांच्याकडून व्यवसाय करून घेत असताना मोनीला अटक केली आहे. पुढील तपास काशिमिरा पोलीस करत आहे.
