अलीकडेच भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये भारती तिच्या बेबी बंपला आत्मविश्वासाने फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पती हर्ष तिच्या शेजारी उभा राहून प्रेमळ अंदाजात तिच्याकडे पाहताना दिसतोय. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, “We are pregnant again” आणि हे वाक्य पाहताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
advertisement
भारती आणि हर्ष यांनी 3 डिसेंबर 2017 रोजी लग्न केलं होतं. 2022 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले “लक्ष्य” (गोला) नावाचा हा गोंडस मुलगा आता दोन वर्षांचा आहे. भारती नेहमीच तिच्या व्लॉग्स आणि कार्यक्रमांमधून गोला आणि तिच्या फॅमिलीबद्दल मजेशीर गोष्टी शेअर करत असते.
आता दुसऱ्या बाळाची खुशखबर मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक सेलेब्सनीही कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. भारती सध्या काही रिअॅलिटी शो होस्ट करत असून, गर्भावस्थेतही ती काम करत आहे.