Vijay-Rashmika: रश्मिकासोबत गुपचूप साखरपुडा? त्यानंतर पहिल्यांदाच समोर आला विजय देवरकोंडा, हातात दिसली Engagement Ring

Last Updated:

Vijay-Rashmika Engagement: दक्षिणेचा हॅंडसम हंक विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कारण आहे त्यांचा गुपचूप साखरपुडा.

रश्मिकासोबत गुपचूप साखरपुडा?
रश्मिकासोबत गुपचूप साखरपुडा?
मुंबई : दक्षिणेचा हॅंडसम हंक विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कारण आहे त्यांचा गुपचूप साखरपुडा. गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या दोन सुपरहिट चित्रपटांमधून दोघांची जोडी प्रचंड गाजली होती. ऑनस्क्रीन रोमॅन्स पाहूनच चाहत्यांना वाटत होतं, हे दोघे खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत. आता साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान विजयचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये त्याच्या हातात अंगठी दिसत आहे.
विजय देवरकोंडा नुकताच श्री सत्य साई बाबांच्या महासमाधीवर आपल्या कुटुंबासह दिसला. साध्या कपड्यांत, चेहऱ्यावर शांत भाव आणि हातात फुलांचा गुच्छ. पण चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं ते त्याच्या अनामिका बोटातील चमकणाऱ्या अंगठीने. सर्वांनी अंदाज लावला की हीच साखरपुड्याची अंगठी असावी.
advertisement
रश्मिका आणि विजयने अद्याप साखरपुड्याच्या चर्चांवर मौन सोडलेलं नाही. दरम्यान, रश्मिका मंदान्नानेही लग्नाच्या अफवांनंतर तिची पहिली सोशल मीडिया पोस्ट टाकली. पण अपेक्षेप्रमाणे ती विजयसोबतचा फोटो नव्हता. तिने ‘थामा’ चित्रपटातील BTS शेअर केलेलं. ज्यावर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या, “आता विजयसोबतचा फोटो कधी?”, “साखरपुडा झाला का?”
advertisement
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला आहे की, विजय देवरकोंडाच्या टीमने त्यांच्या साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा साखरपुडा समारंभ हैदराबाद येथे झाला असून, त्यासाठी फक्त दोन्हीकडील कुटुंबीय सदस्य आणि अगदी जवळचे मित्र उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे कपल फेब्रुवारी 2026 मध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vijay-Rashmika: रश्मिकासोबत गुपचूप साखरपुडा? त्यानंतर पहिल्यांदाच समोर आला विजय देवरकोंडा, हातात दिसली Engagement Ring
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement