भारती सिंहची प्रकृती खालावली?
भारती सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारती रुग्णालयातील स्ट्रैचरवर झोपलेली दिसत आहे. तसेच तिची प्रकृतीदेखील खालावलेली पाहायला मिळत आहे. प्रेग्नंट झाल्यापासून भारती सिंहला प्रकृतीसंबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिच्या चेहऱ्यावर तिला होणारा त्रास स्पष्ट दिसून येतो.
भारती सिंहच्या त्या व्हिडीओमागचं सत्य
advertisement
भारती सिंहच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहते या व्हिडीओवर भारतीला मुलगी व्हावी, असं म्हणत आहेत. पण खरंतर भारती सिंहचा हा व्हिडीओ जुना आहे. हा व्हिडीओ भारती सिंहच्या पहिल्या प्रेग्नंसीदरम्यानचा आहे. दुसरीकडे भारतीच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची वेळ आता जवळ आली आहे. भारती सिंह चाहत्यांना कोणत्याही क्षणी गुडन्यूज देऊ शकते.
भारती सिंहला जुळी मुलं होणार?
भारती सिंह जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. भारतीने आपल्या व्लॉगमध्ये जुळ्या मुलांबाबत एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर हर्ष प्रचंड खुश झाला होता. जुळी मुलं झाली तर मी आणखी आनंदी होईल, असं हर्ष म्हणाला होता. त्यानंतर भारती सिंह म्हणते की जुळी मुलं होणार नाहीत.
