Mumbai Market : मार्गशीर्ष महिन्यातील हळदी कुंकूसाठी वाणं, फक्त 40 रुपयांपासून, मुंबईत प्रसिद्ध मार्केटमध्ये करा खरेदी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होताच महिलांमध्ये पारंपरिक पूजा-विधी, हळदी-कुंकू समारंभ आणि वाण देण्याच्या तयारीला मोठी सुरुवात झाली आहे. विशेषत: मुंबईच्या भुलेश्वर मार्केटमध्ये या पारंपरिक साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबई : मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होताच महिलांमध्ये पारंपरिक पूजा-विधी, हळदी-कुंकू समारंभ आणि वाण देण्याच्या तयारीला मोठी सुरुवात झाली आहे. विशेषत: मुंबईच्या भुलेश्वर मार्केटमध्ये या पारंपरिक साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. घराघरांत हळदी-कुंकू समारंभांचे आयोजन होत असल्याने आकर्षक बॅग्ज, ज्वेलरी किट्स, पोटल्या, साडी कव्हर्स, बांगड्यांचे बॉक्स अशी विविध भेटवस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भुलेश्वर मधील निकिता नॉवेल्टी हे दुकान विशेष लोकप्रिय ठरत आहे. सुरती हॉटेलच्या बाजूला असलेले हे दुकान आकर्षक आणि परवडणाऱ्या किमतीत विविध वस्तू उपलब्ध करून देत असून या दुकानात सरस्वती यंत्र असलेल्या कापडी बॅग्स महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. फक्त 40 रुपयांना मिळणाऱ्या या बॅग्स सहा वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध आहेत.
advertisement
तसेच कापडी आकर्षक आकारातील ज्वेलरी किट देखील मोठ्या प्रमाणात खपताना दिसत आहे. या किट्सच्या किमती आकारानुसार 50, 60 आणि 70 रुपये इतक्या आहेत. बांगड्यांचा बॉक्स हा महिलांमध्ये वाण म्हणून पसंत केला जाणारा आणखी एक पर्याय असून हा 120 प्रति पीस दराने मिळतो. याशिवाय सिंगल साडी कव्हर हेही अत्यंत लोकप्रिय असून ते एक डझन 250 रुपये या दराने उपलब्ध आहे. आकर्षक पोटाली, फोन कव्हर्स आणि इतर आकर्षक कापडी बॅग्स यांचेही पर्याय ग्राहकांना येथे मोठ्या प्रमाणावर मिळतात.
advertisement
होलसेल दुकान असल्यामुळे येथे खरेदी करताना किमान 6 ते 12 पीसेस घ्यावे लागतात. मात्र परवडणाऱ्या किमती, चांगली गुणवत्ता आणि नवीन डिझाईन्समुळे भुलेश्वर मार्केट महिलांच्या खरेदीसाठी प्रथम पसंतीचे ठिकाण ठरत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 4:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mumbai Market : मार्गशीर्ष महिन्यातील हळदी कुंकूसाठी वाणं, फक्त 40 रुपयांपासून, मुंबईत प्रसिद्ध मार्केटमध्ये करा खरेदी

