पार्थ पवार प्रकरणात मोठी कारवाई, शीतल तेजवानीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Shital Tejwani Arrest Pune Land Scam: पुणे जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी बुधवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास शीतल तेजवानीला अटक केली. याआधी दोन ते तीन वेळा तिची कसून चौकशी करण्यात आली होती.
पुणे : पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या शीतल तेजवानीला अटक करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास शीतल तेजवानीला अटक केली. याआधी दोन ते तीन वेळा तिची कसून चौकशी करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे संचालक असलेल्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्कातील जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांचा दोन ते तीन वेळा जबाब नोंदविण्यात आला. तसेच विविध शासकीय विभागांकडून मागविण्यात आलेल्या कागदपत्रांची चौकशी देखील करण्यात आली होती. गरज भासल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येईल, असे पोलिसांकडून त्यांना सांगण्यात आले. अखेर बुधवारी तेजवानी यांच्यावर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटकेची कारवाई केली.
advertisement
चौकशीत थेट सहभाग असल्याचे स्पष्ट
मुंढवा येथील कोट्यवधींच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीवर अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
शीतल तेजवानीवर नेमका आरोप काय?
advertisement
महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी शीतल तेजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. शीतल तेजवानी आणि मूळ मालक गायकवाड कुटुंब आरोपांच्या घेऱ्यात आहे. शीतल तेजवानी ही जमीन गैरव्यवहारातील बडा मासा आहे. बनावट कागदपत्र तयार करून जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जमिनीचे बोगस कागदपत्र कुणी तयार केले असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 2014 ला न्यायालयाने तेजवाणी, मूळ मालकांचा दावा फेटाळला होता.
advertisement
मुंढवा जमीन प्रकरणात पोलिसांचा कसून तपास
मुंढवा जमीन प्रकरणात २७५ जणांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. ही जमीन कुलमुख्यारपत्र करुन शीतल तेजवानी यांना संबंधित व्यक्तींनी दिली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 4:53 PM IST


