'त्या तशाच बनल्या आहेत', पूजा बिरारीच्या लग्नात विशाल निकमने सोहमला दिला स्पेशल सल्ला, पाहा काय म्हणाला

Last Updated:
Pooja Birari-Soham Bandekar Wedding: 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतील मंजिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजाने सोहम बांदेकरशी लग्नगाठ बांधली. पूजाचा सहकलाकार विशाल निकम याने नवदाम्पत्याला एक खास सल्ला दिला आहे.
1/9
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतील मंजिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजाने मालिकेचा निर्माता सोहम बांदेकर याच्याशी लोणावळ्यात थाटामाटात लग्नगाठ बांधली.

advertisement
2/9
दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच, पूजाचा सहकलाकार विशाल निकम याने नवदाम्पत्याला एक मिश्किल पण महत्त्वाचा सल्ला दिला आहे!

3/9
'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत राया आणि मंजिरी यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच दोघांची ऑफस्क्रीन मैत्रीही खूप छान आहे. याच मैत्रीच्या नात्याने विशालने काही दिवसांपूर्वी सोहमला खास सल्ला दिला होता.

4/9
विशाल निकम मिश्किलपणे म्हणाला होता,
विशाल निकम मिश्किलपणे म्हणाला होता, "दोघांनी एकमेकांनी समजून घ्यावं, प्रेमाने राहावं. पण मी सोहमला सांगेन की, तुलाच जास्त समजून घ्यावं लागणार आहे!"
advertisement
5/9
विशाल पुढे म्हणालेला,
विशाल पुढे म्हणालेला, "मुलींना समजून घेणं हे काही सोपं नाही, कारण त्या तशाच बनल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात बदल करायला जायचं नाही. मुलांनीच स्वतःमध्ये बदल करायचे असतात, तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात."
advertisement
6/9
 "मी या सगळ्या भावना समजू शकतो आणि मी ते माझ्या आयुष्यात अनुभवतही आहे," असे सांगत विशालने सोहम आणि पूजाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच, पूजा खूप समजूतदार असल्याने त्यांना जास्त सल्ल्याची गरज नाही, असेही तो म्हणाला होता.

7/9
दरम्यान, पूजा आणि सोहमच्या लग्नानंतर विशालने आपल्या लाडक्या मैत्रिणीला शुभेच्छा दिल्या. विशालने खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, “दोन सुंदर व्यक्तींची मनं आज एक झाली आहेत. तुम्हा दोघांना भरपूर प्रेम, कायम असेच हसत राहा आणि आयुष्यभर आनंदी राहा”

8/9
पुण्याची असलेली पूजा बिरारी आता बांदेकर कुटुंबाची सून झाली आहे. सोहम बांदेकर हा 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेचा निर्माता असून, बांदेकर प्रोडक्शन्सचे काम पाहतो.

9/9
पूजा पहिल्यांदा 'साजणा' या मालिकेत दिसली होती. त्यानंतर 'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' या लोकप्रिय मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement