Gautam Gambhir : 'तुला बाहेर काढलं जाईल...', गंभीरची जागा धोक्यात, विराटच्या सगळ्यात जवळच्या माणसाची वॉर्निंग!

Last Updated:

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून गौतम गंभीर दबावाखाली आहे, त्यातच आता गंभीरची जागा धोक्यात असल्याचं वक्तव्य विराट कोहलीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने केलं आहे.

'तुला बाहेर काढलं जाईल...', गंभीरची जागा धोक्यात, विराटच्या सगळ्यात जवळच्या माणसाची वॉर्निंग!
'तुला बाहेर काढलं जाईल...', गंभीरची जागा धोक्यात, विराटच्या सगळ्यात जवळच्या माणसाची वॉर्निंग!
मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून गौतम गंभीर दबावाखाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्याच मैदानात टीम इंडियाचा टेस्ट सीरिजमध्ये 0-2 ने पराभव झाला, त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये गौतम गंभीरला बाहेर केलं जाऊ शकतं, पण परिस्थिती शांतपणे आणि संयमाने हाताळण्याची गरज आहे, असं वक्तव्य भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं आहे.
'जर तुमची कामगिरी खराब असेल तर तुम्हाला काढून टाकले जाऊ शकते. म्हणून, तुम्ही संयम राखला पाहिजे. इथे संवाद आणि व्यवस्थापन कौशल्ये महत्त्वाची आहेत. त्यानंतरच तुम्ही खेळाडूंना जिंकण्यासाठी प्रेरित करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही करता त्याचा आनंद घ्या आणि ते दबाव म्हणून घेऊ नका', असं प्रभात खबरला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले.
advertisement
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून दीड वर्षाच्या कार्यकाळात गंभीरने यश आणि अपयश दोन्ही पाहिले. या काळात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपमध्ये विजय मिळवला. या दोन्ही स्पर्धांमध्ये टीम इंडियाने सगळे सामने जिंकले, पण टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाने लाजिरवाणी कामगिरी केली. मागच्या वर्षी न्यूझीलंड आणि आता दक्षिण आफ्रिकेने भारताला भारतामध्येच व्हाईट वॉश केले. तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला.
advertisement
दुसरीकडे गौतम गंभीरचे टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गंभीरचे या दोन्ही दिग्गज खेळाडूंसोबतचे संबंध बिघडले असल्याची अनेक वृत्त समोर आली आहेत. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरसमोर आता सगळ्यात मोठं आव्हान टी-20 वर्ल्ड कप आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपमधल्या टीम इंडियाच्या कामगिरीवरही गंभीरचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir : 'तुला बाहेर काढलं जाईल...', गंभीरची जागा धोक्यात, विराटच्या सगळ्यात जवळच्या माणसाची वॉर्निंग!
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement