Gajrache Lonche : गाजराचा हलवा खाऊन कंटाळलात? हिवाळ्यात बनवा ही खास रेसिपी, खाल आवडीने Video

Last Updated:

गाजर खाणे खूप फायदेशीर ठरते. गाजरामुळे डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते आणि आपल्याला फायदे देखील मोठ्या प्रमाणात होतात.

+
गाजराच्या

गाजराच्या हलव्यापेक्षा करा हे झटपट होणारे गाजराचे लोणचे 

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा सुरू आहे. सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर विक्रीसाठी आलेले आहेत. गाजर खाणे खूप फायदेशीर ठरते. गाजरामुळे डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते आणि आपल्याला फायदे देखील मोठ्या प्रमाणात होतात. आपण नेहमीच गाजराचा हलवा करत असतो पण यापेक्षा तुम्हाला वेगळे काही खायचे असेल तर तुम्ही गाजराचे लोणचे करू शकता. अगदी पाच मिनिटांमध्ये हे बनवून तयार होते. तर याची रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितलेली आहे.
गाजराचे लोणचे साहित्य
1 मोठा गाजर, शेंगदाण्याचे तेल, हिंग, हळद, लाल तिखट, जिरे, मोहरी, मीठ आणि लिंबू एवढेच साहित्य यासाठी लागेल.
गाजराचे लोणचे कृती
सुरुवातीला गाजर स्वच्छ धुऊन त्याची साल काढून घ्यावी आणि बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवावी त्यात शेंगदाण्याचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर फोडणी द्यायची, त्यात मोहरी, जिरे आणि हिंग टाकून घ्यायचा. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचे आणि त्याला थंड होऊ द्यायचे. हे थंड झाल्यानंतर यामध्ये हळद आणि तिखट टाकून घ्यायचे आणि ही तयार केलेली फोडणी गाजराच्या फोडीवर टाकून त्यावरती थोडेसे लिंबू एकत्र करून घ्यायचे. यामध्ये तुम्ही बाजारात भेटणारा लोणच्याचा मसाला देखील घालू शकता. ते ऑप्शनल आहे. अशा पद्धतीने हे बनवून तयार होते, तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Gajrache Lonche : गाजराचा हलवा खाऊन कंटाळलात? हिवाळ्यात बनवा ही खास रेसिपी, खाल आवडीने Video
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement