बिग बॉसच्या नव्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे की अंकिता पुन्हा एकदा सुशांतची आठवण काढते. सुशांतनं पीके सिनेमात पहिल्यांदा ऑनस्क्रिन किस केलं होतं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमावेळी त्यानं एक थिएटर फक्त अंकितासाठी बुक केलं होतं. कारण या सिनेमात त्यानं काही इंटिमेट सीन्स दिले होते.
advertisement
अंकितानं पीके सिनेमात अनुष्का शर्मा आणि सुशांतच्या किसिंगवर प्रतिक्रिया देत म्हटलं, 'जेव्हा मी पीके सिनेमा पाहिला तेव्हा मला चक्कर आली होती. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स सिनेमातील सुशांतचा इंटिमेट सीनवर अंकिता म्हणाली, सुशांतला दुसऱ्या मुलीबरोबर किस करताना पाहून माझं मन तुटलं होतं.'
अंकिता पुढे म्हणाली, 'आम्ही सिनेमा पाहायला गेलो. सुशांतनं यशराज स्टुडिओचा संपूर्ण थिएटर हॉल बुक केला होता. तिथे माझ्या आणि सुशांतशिवाय कोणीही नव्हतं. सुशांत हा सिनेमा इतर कोणाबरोबरच पाहू शकत नव्हता कारण त्याला माहिती होतं की तो मला गमावून बसेल. पूर्ण सिनेमा पाहताना मी माझ्या नखांनी सुशांतला ओरबटलं होतं.'
अंकिता पुढे म्हणाली, 'तो तेव्हा तिथून निघून गेला. मी संपूर्ण सिनेमा पाहिला आणि सगळे सीन पाहून घरी जाऊन खूप रडले. सुशांत देखील खूप रडला होता. मला माफ कर बुबू पुन्हा असं करणार नाही, असं म्हणत त्यानं माझी माफी मागितली होती.'